मुंबई

भाज्यांचे दर वधारले

CD

भाज्यांचे भाव शंभरी पार
पावसामुळे टंचाई; नोव्हेंबरपर्यंत भाव चढे राहण्याचा अंदाज
वाशी, ता. ३० (बातमीदार) : सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका राज्यातील भाज्यांच्या पिकांना बसला असून, त्याचा परिणाम थेट किरकोळ बाजारावर दिसून येतो आहे. एपीएमसी बाजारातील भाज्यांची आवक लक्षणीय घटल्यामुळे किरकोळ बाजारात दर शंभरी पार गेले आहेत. विशेषतः पालेभाज्यांचा पुरवठा कमी झाला असून, त्यांच्या भावांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
साधारणतः एपीएमसी बाजारात दररोज ६०० गाड्यांची आवक होत असते. मात्र सध्या ही संख्या ४०० ते ४५० गाड्यांपर्यंत घटली आहे. त्यामुळे भाजीपाला उपलब्धतेत तुटवडा निर्माण झाला असून, ग्राहकांना दुप्पटी दराने खरेदी करावी लागत आहे. नवरात्रोत्सवानंतर दर आटोक्यात येतील अशी अपेक्षा होती; मात्र पावसाच्या लहरीपणामुळे भाज्या नासधूस होत असल्याने भाव अधिक वाढले आहेत.
भाजी विक्रेत्यांच्या मते, या स्थितीत नोव्हेंबर महिन्यापर्यंतच दर कमी होण्याची शक्यता आहे.
....................
वाटाण्यात घट
पालेभाज्यांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. तर फळभाज्यांचे दर तुलनेने स्थिर आहेत. मात्र, गुणवत्तेत घसरण झाली असून, अनेक भाज्या दर्जाहीन अवस्थेत बाजारात येत आहेत. यामध्ये नाशिक, सातारा, नगर, पुणे आणि गुजरात येथून येणाऱ्या भाज्यांची मोठी आवक होत असली तरी संततधार पावसामुळे त्या भाज्याही खराब होऊन बाजारात पोहोचत आहेत. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि पंजाबमधून येणाऱ्या वाटाण्याच्या आवकेत देखील घट झाली आहे. त्यामुळे वाटाण्याचे दर १२० ते १५० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
...................
बॉक्स : एपीएमसी घाऊक बाजारातील दर (प्रति किलो)

काकडी: १८ ते २८ रूपये

टोमॅटो: १६ ते २० रूपये

फरसबी: ५० ते ६० रूपये

शेवगा: ३० ते ४० रूपये

गाजर: १६ ते १८ रूपये

वाटाणा: १२० ते १५० रूपये

फ्लॉवर: १२ ते १४ रूपये

वांगी: २० ते २४ रूपये
......................
कोट
सध्या सुरू असलेल्या पावसामुळे एपीएमसी बाजारात भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर घटली आहे. त्याचबरोबर भाज्या खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे दर वाढले असून नोव्हेंबरपर्यंत ही परिस्थिती कायम राहील.
- के. डी. भाळके, व्यापारी, एपीएमसी मार्केट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JNU Ravan Dahan controversy : उमर खालिद अन् शरजीलचे फोटो पुतळ्यावर लावून 'जेएनयू'मध्ये झाले रावणाचे दहन!

Uddhav Thackeray: राज ठाकरेंसोबत युती आहे की नाही? दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी थेट उत्तर देत विषयच संपवला, म्हणाले...

World Cup 2025: पाकिस्तानची पहिल्याच सामन्यात दयनीय अवस्था! आधी १२९ वर ऑलआऊट केलं अन् मग बांगालादेशनं गोलंदाजांनाही झोडलं

Talegaon Dhamdhere News : आठवीत शिकणाऱ्या शेतमजुराच्या अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन संपविले जीवन

Latest Marathi News Live Update : शिवसेनेच्या खासदारांचे १ महिन्याचे वेतन शेतकऱ्यांसाठी

SCROLL FOR NEXT