तांदळाच्या उकडीच्या मुखवट्याची साकारली श्री महालक्ष्मी
कल्याण (वार्ताहर) : कल्याण येथील ऐतिहासिक श्री त्रिविक्रम मंदिरात दरवर्षीप्रमाणे अष्टमीच्या दिवशी श्री महालक्ष्मी पूजन पारंपरिक पद्धतीने पार पडले. श्री ब्राह्मण भगिनी श्री महालक्ष्मी मंडळ, कल्याण यांच्या वतीने १९३७ सालापासून हा उपक्रम सातत्याने राबवला जात आहे. या वेळी विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे तांदळाच्या उकडीपासून तयार केलेल्या मुखवट्याची श्री महालक्ष्मी मूर्ती. या पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. महालक्ष्मी पूजनासोबतच नवमीच्या दिवशी ‘घागरी फुंकण्याची’ परंपराही याच ठिकाणी जपली जाते. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत महालक्ष्मी पूजन करीत भक्तिभावाने सहभाग घेतला. मंदिरातील वातावरण भक्तिपूर्ण व उत्साहाने भरलेले होते. यामुळे परंपरेला नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यांची खास सजावट, पारंपरिक पूजा विधी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची छटा यामुळे वातावरण पवित्र आणि मंगलमय झाले होते.
..........................
पं. दीनदयाळ उपाध्याय स्पर्श शिष्यवृत्ती परीक्षा
कल्याण (वार्ताहर) : भारतीय डाक विभागाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय स्पर्श शिष्यवृत्ती योजनेंतर्गत कल्याण येथील कॅप्टन रवींद्र माधव ओक हायस्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. या योजनेनुसार प्रत्येक डाक परिमंडळातील ४० गुणवंत विद्यार्थ्यांना दरमहा ५०० रुपये (वार्षिक सहा हजार रुपये) शिष्यवृत्ती दिली जाते. या परीक्षेत ७वी, ८वी आणि ९वीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. परीक्षा सुरळीत आणि शिस्तबद्ध पार पडली. शाळेचे मुख्याध्यापक दिलीप तडवी, कलाशिक्षक पांडुरंग भारती व निवृत्त शिक्षक कैलास सरोदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. डाक विभागामार्फत केंद्रप्रमुख म्हणून पोस्टमास्टर नागेश खैरनार, सतर्कता निरीक्षक मुबारक तडवी, कार्यकारी अधिकारी संदीप जाधव, एपीएम शशी वरठे व इतर कर्मचारी उपस्थित होते. परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना प्रेरणादायक मार्गदर्शन देण्यात आले आणि त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.