मुंबई

थोडक्‍यात नवी मुंबई

CD

नेरूळमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा
तुर्भे, ता. २ (बातमीदार) ः ज्वेल ऑफ नवी मुंबई येथील तथागत भगवान गौतम बुद्ध पुतळ्या समोर गुरुवारी (ता. २) धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी उपस्थित सर्व अनुयायांनी भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून सामाजिक समता, बंधुता व न्याय या मूल्यांचा पुन्हा एकदा संकल्प केला. तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिन हा केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक क्रांतीचा दिवस आहे. १९५६ रोजी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह याच दिवशी बौद्ध धम्माची दीक्षा घेत लाखो समाजबांधवांना नवसंजीवनी दिली होती. त्यांचे विचार आजही समाजाच्या प्रगतीस दिशा देणारे आहेत. तसेच नेरूळ ज्वेल नवी मुंबई येथे उभारण्यात आलेल्या तथागत गौतम बुद्धांचे स्मारक हे केवळ एक स्मारक नसून समाजातील समता, करूणा व मैत्रीच्या मूल्यांचे प्रतिक आहे, असे आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले. यावेळी आमदार मंदा म्हात्रे यांच्या समवेत माजी नगरसेविका अनिता शेट्टी, महेश खरे, विकास सोरटे, रवींद्र सावंत, राम झेंडे, नेरूळ (प) मंडळ अध्यक्ष तसेच नवी मुंबईतील विविध बौद्ध विहारांतील भिक्षू, नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
....................................................
कामोठेतील पेट्रोल पंप दिवाळीपूर्वी सुरू होणार
पनवेल (बातमीदार) : कामोठे परिसरातील नागरिकांसाठी दीर्घकाळाचा प्रश्न अखेर समाधानाच्या मार्गावर आला आहे. सेक्टर १८ येथील पूर्ण झालेले, परंतु गेली तीन वर्षे बंद असलेले पेट्रोल पंप लवकरच सुरू होणार असल्याचे आश्वासन भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दिले. पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांत दादा ठाकूर आणि माजी नगरसेवक विकास घरत यांच्या मार्गदर्शनाखाली कामोठे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पेट्रोल पंपाचे स्थळ पाहणी करून या विषयावर ठामपणे चर्चा केली. यावेळी संबंधित व्यवस्थापकाशी दूरध्वनीवरून संवाद साधण्यात आला. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पेट्रोल पंप सुरू करण्यासाठीची सर्व आवश्यक प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने सिडको, वन विभाग आणि पनवेल महानगरपालिकेच्या सहकार्याने येत्या काही दिवसांत बैठक घेण्यात येणार असून, दिवाळीपूर्वी पेट्रोल पंप सुरू करण्याचे ठाम आश्वासन देण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून पेट्रोल पंप बंद असल्यामुळे स्थानिक नागरिकांना पेट्रोलसाठी दूरवर जावे लागत होते, ज्यामुळे वेळ, इंधन व ऊर्जा वाया जात होती तसेच अपघातांचा धोका वाढत होता. माजी नगरसेवक विकास घरत यांनी स्पष्ट केले की, कामोठे परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी हा पंप लवकरात लवकर सुरू व्हावा यासाठी भाजप कामोठे मंडळ सातत्याने प्रयत्नशील आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक वाहतूक व जीवनमानात सुधारणा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
..........
खारघर गावातील समस्या दूर करण्याची मागणी
खारघर (बातमीदार) : ईश फाउंडेशनच्या वतीने खारघर परिसरातील गावांमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव दूर करण्यासाठी पालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे निवेदन दिले आहे. खारघर, कोपरा, बेलपाडा, मुर्बी, रांजणपाडा, ओवे, पेठ, खुटूक बांधन व ओवेकॅम्पसह अनेक गावे व पाड्यांमध्ये रस्ते, पाणीपुरवठा, पदपथ व गटारे यांची दयनीय अवस्था आहे. निवेदनात म्हटले आहे की, सिडकोकडून पुरेसा पाणीपुरवठा होत नाही, पदपथ मोडकळीस आले आहेत, गटारे तुडुंब भरले आहेत, स्वच्छता गृहांची स्थिती बिकट आहे. दिवसातून दोन वेळा घंटागाडीचा सेवा नियमित होणे आवश्यक आहे, मात्र पालिकेकडून हे नियोजन होत नाही. प्रकल्पग्रस्त भूमीपत्रावर उभा खारघर शहर विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असून, त्यामुळे पालिका आयुक्तांनी गावाची पाहणी करून समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी विनंती ईश फाउंडेशनच्या अध्यक्षा कीर्ती मेहरा यांनी केली आहे.
..............
नेरूळ येथील दुर्गोत्सवात भक्तिगीतांचे सादरीकरण
खारघर (बातमीदार) : नवरात्रोत्सवाच्या निमित्त खारघरतील महिलांनी नेरूळ येथील गुरू देवा नारायण स्वामी मंदिरात भक्तिगीतांचे अद्वितीय सादरीकरण केले. महिलांनी नवव्या दिवशी विविध भाषांमध्ये गीत गायन केले गेले. अर्जुन साजी, वसुमथी करथीकेयन, बबिता पांडे, सुमन शेनॉय, अभिजित नवलगी, अश्विनी पाटील, स्नेहा सहस्त्रबुद्धे, ऑस्कर सिक्वेरीया, रंजूषा साजी, प्राची देशपांडे व शशिकांत शेनॉय यांनी मराठी, हिंदी, पंजाबी, गुजराथी, तेलगू, तमिळ, कन्नड व मल्याळम अशा एकूण ९ भाषांमध्ये गीत सादर केले. हा भक्तिगीतांचा उपक्रम फक्त संगीताचा आनंद देत नाही तर समाजातील एकात्मतेचा संदेशही देतो, असे यावेळी सांगितले. उपस्थित भक्तांनी या गीत कार्यक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले आणि महिलांच्या निस्वार्थ सेवेवर अभिमान व्यक्त केला.
............
पांडव मार्ग ते शीघ्र कृती दल रस्त्यावरील पथदिवे बंद
खारघर (बातमीदार) : पांडव सर्कल ते शीघ्र कृती दल मार्गावर नागरिकांना सध्या अंधारात प्रवास करावा लागत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून या रस्त्यावरील पथदिवे बंद आहेत. यामुळे रात्री-अपरात्री येथील प्रवास वाहनचालक व पायी प्रवाशांसाठी धोकादायक होत चालला आहे. कल्याण–तळोजा मेट्रो मार्गावर पिल्लर उभारणीसाठी दिवे लावण्यात आले होते, परंतु सध्या काम बंद असल्यामुळे रस्ता अंधारमय झाला आहे. पनवेल महापालिकेने या पथदिव्यांची देखभाल व दुरुस्तीचा ठेका दिला असला तरी प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. नागरिकांनी पालिकेच्या विद्युत विभागाला यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.
.................
सानपाडा परिसरात स्वच्छता अभियान
जुईनगर (बातमीदार) : सानपाडा परिसरातील उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रमाणावर जमा झालेला कचरा आणि दुर्गंधी दूर करण्यासाठी स्वच्छता अभियान राबवण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुरू असलेल्या उपक्रमांतर्गत, भाजप नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष आबासाहेब जगताप यांच्या नेतृत्वाखाली ही सफाई करण्यात आली. या उपक्रमात वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, नशामुक्त शहरासाठी मॅरेथॉन, महिला बचत गटातील बेरोजगार महिलांना आर्थिक मदत, तसेच स्वच्छता अभियान यांचा समावेश होता. निसर्गप्रेमी फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील नाईक, सचिव चंद्रकांत सरनोबत व महापालिकेचे अधिकारी जयेश पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते व सफाई कामगार उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JNU Ravan Dahan controversy : उमर खालिद अन् शरजीलचे फोटो पुतळ्यावर लावून 'जेएनयू'मध्ये झाले रावणाचे दहन!

Uddhav Thackeray: राज ठाकरेंसोबत युती आहे की नाही? दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी थेट उत्तर देत विषयच संपवला, म्हणाले...

World Cup 2025: पाकिस्तानची पहिल्याच सामन्यात दयनीय अवस्था! आधी १२९ वर ऑलआऊट केलं अन् मग बांगालादेशनं गोलंदाजांनाही झोडलं

Talegaon Dhamdhere News : आठवीत शिकणाऱ्या शेतमजुराच्या अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन संपविले जीवन

Latest Marathi News Live Update : शिवसेनेच्या खासदारांचे १ महिन्याचे वेतन शेतकऱ्यांसाठी

SCROLL FOR NEXT