मुंबई

अतिवृष्टीचे भातशेतीवर संकट

CD

डहाणू, ता. ६ (बातमीदार) : तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट, रोग, वादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावे लागत आहे. अशातच वाढती मजुरी, महागडी रासायनिक खते, बी बियाणे, कीटकनाशक, औषधे, ट्रॅक्टरची नांगरणी यामुळे आधीच तोट्यात असणारी भातशेती शेतकऱ्यांना परवडत नाही.

यावर्षी मेच्या पहिल्या आठवड्यात पावसाने झोडपले. पाच महिने उलटून गेले तरी पाऊस थांबण्याचे चिन्ह नाहीत. डहाणू हवामान विभागाच्या नोंदीनुसार, मेपासून सप्टेंबरपर्यंत तब्बल दोन ६९२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शेतकऱ्यांनी भातपेरणीला मेपासूनच सुरुवात केली, मात्र काही शेतकऱ्यांनी हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार, भातपेरणी न केलेल्यांना सततच्या पावसामुळे ही संधीच मिळाली नाही.

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे ९० दिवसांत तयार होणारी हळवी भात शेती कापणीस तयार होऊन खाचरात आडवी पडून कुजू लागली आहे. ११५ ते १२० दिवसात तयार होणारी निमगरवी भात शेती फुलोऱ्यावर येऊन निसवण्यास सुरुवात झाली असतानाच मेघगर्जनेसह पाऊस, वादळी वारे, सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे दाणे भरण्याची प्रक्रिया बंद पडली. परिणामी २० टक्केदेखील दाणे भरणार नाहीत, अशी शेतकऱ्यांना भीती आहे. त्यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली अडकलेल्या शेतकऱ्यांना मराठवाडा, विदर्भाप्रमाणे सरसकट मदतीचा हात द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

पंचनाम्यांना वेग
डहाणू तालुक्यात नुकसान झालेल्या भातशेतीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक आदींनी गावागावात जाऊन पंचनामे करण्याचे काम सुरू केल्याचे तहसीलदार सुनील कोळी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S.T. Workers: दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा इशारा; मशाल मोर्चा निघणार, नेमक्या मागण्या काय?

Mayawati on Bihar Election : बिहार निवडणुकीसाठी मायावतींनी घेतला मोठा निर्णय ; ट्वीटद्वारे 'बसपा'ची भूमिका जाहीर!

Pune News : महापालिका निवडणुकीसाठी ५ हजार मतदान केंद्र

Pune Water Close : पुणे शहराच्या बहुतांश भागात गुरुवारी पाणी पुरवठा राहणार बंद

जगातला सगळ्यात मोठा डॉन; 'मुळशी पॅटर्न'प्रमाणेच बकासूर झाला अन् अमेरिकेच्या जेलमध्ये तडफडून मेला

SCROLL FOR NEXT