सानेगाव आश्रम शाळेत जयंती उत्साहात
रोहा ता.२ (बातमीदार) ः शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा सानेगाव रोहा येथे भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. गुरुवार (ता.२) सकाळी ठीक ९.०० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शाळेचे पदवीधर प्राथमिक शिक्षक एम .पी. पाटील सर यांनी केले. या कार्यक्रमाला उपस्थित शिक्षक बंधू-भगिनी यांच्या हस्ते महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक मधुकर फसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली या जयंती उत्सवाचे आयोजन आश्रमशाळेत करण्यात आले होते. शाळेतील माध्यमिक शिक्षक डी. एम. बाळ सकपाळ यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांचा थोडक्यात विद्यार्थ्यांना परिचय करून दिला. त्यानंतर शाळेतील उच्च माध्यमिक शिक्षक श्री आढळ सर यांनी कार्यक्रमाला उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी तसेच विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचे सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.