मुंबई

आई अंबे कृपा करी!

CD

वसई, ता. २ (बातमीदार) : ‘आई अंबाबाईचा, तुळजाभवानीचा उदो उदो’, ‘दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी’ यासह आदिशक्तीचा जागर करणारी आरती, भजन, गाणी गात भाविकांनी उत्साहात देवीच्या मूर्तींची आज (ता. २) विसर्जन मिरवणूक काढली. या वेळी टाळ-चिपळ्यांचा नाद निनादत होता. वसई-विरार शहरातील विविध भागांत मूर्तीचे भावपूर्ण आणि शांततेत विसर्जन पार पडले.

वसई-विरार शहरात नऊ दिवस देवीची पूजेसह धार्मिक कार्यक्रम, तसेच रात्रीच्या वेळी गरबा आणि दांडियाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रफुल्लित वातावरण दिसून आले. अनेक महिला भाविकांनी बस, खासगी वाहनांतून एकत्रित प्रवास करून नऊ देवींचे दर्शन घेतले. या वेळी खणा-नारळाने देवीची ओटी भरण्यात आली. अनेक मंदिरात होम हवन, भजन, कीर्तन, प्रवचन, देवीचे पठण यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सार्वजनिक मंडळात देखील भक्तिमय वातावरण दिसून आले, तर काही ठिकाणी भंडाऱ्याचे आयोजनदेखील करण्यात आले होते.

दसऱ्याच्या दिवशी नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. गृहसंकुल, सार्वजनिक चौकात, तसेच घरोघरी जाऊन दसऱ्याचा आनंद लुटला. मिठाई, खाद्यपदार्थ दुकानांत नागरिकांची सकाळपासून गर्दी झाली होती. मिष्ठान्नाचा आनंद घेण्यात आला. सार्वजनिक मंडळ, तसेच घरगुती मूर्तींचे पालिकेचे २३ कृत्रिम तलाव, बंद दगडखाणी व समुद्रकिनारी विसर्जन करण्यात आले. तर घटस्थापना व्रताची सांगता करत नागरिकांनी देवीकडे मंगलमय, सुखाची प्रार्थना केली.

मंदिरात गर्दी
विरार येथील जीवदानी देवी, नायगाव चण्डिका देवी, नालासोपारा उमादेवी, वसई तुळजाभवानी, गायत्री मंदिर, निर्मळ एकवीरा, महालक्ष्मी यासह विविध ठिकाणी असणाऱ्या मंदिरात सकाळपासून नागरिकांची देवीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी झाली होती. या वेळी मंदिर प्रशासनाने भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी खबरदारी घेतली होती.

बाजारपेठेसाठी उलाढालीचा दिवस
सुट्टी आणि दसऱ्याचा मुहूर्त साधत नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केली होती. दुकानदारांनी विविध वस्तूंवर खास आकर्षक सवलत जाहीर केल्याने ग्राहकांचा खरेदीकडे कल असल्याचे दिसून आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढालीला वेग आला होता. बाजारपेठेला दसऱ्यामुळे चांगले दिवस आले होते.

सोने लुटले
आपट्याची पाने हाती घेत प्रथम देवीच्या चरणी अर्पण करण्यात आली. त्यानंतर नागरिकांनी सीमोल्लंघन केले व पाने एकमेकांना देत सोनं लुटण्यात आले. या वेळी प्रत्येक जण धन संपदा येऊ दे, अशा शुभेच्छा एकमेकांना देत आनंद साजरा करत असल्याचे दिसून आले.

चोख बंदोबस्त
दसऱ्याच्या दिवशी देवीच्या मूर्तीचे विसर्जन व सावर्जनिक ठिकाणी होणारी गर्दी पाहता वसई-विरार शहरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिसांकडून करडी नजर ठेवण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident एकमेकांचे जिवलग मित्र… मिळून थार घेतली; ताम्हिणी घाटात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची हृदयद्रावक करुणकथा

ऊसतोड मशीनमध्ये सापडून महिलेचा दुर्दैवी अंत; संक्रट्टी कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, हा भयंकर अपघात पाहून...

Pune News : काय सांगता? पुण्यात नगरसेवक पदासाठी चक्क १ कोटीची बोली...नेमका कुठं घडला प्रकार?

Tamhini Ghat Accident : प्रगतीची भरारी राहिली अर्धवट; अपघातानंतर कोंढवे धावडे, कोपरे परिसरात शोककळा

Latest Marathi News Live Update : तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार प्रकरणी आज मालेगाव बंद

SCROLL FOR NEXT