कासा (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चारोटी येथील हॉटेल शेर-ए-पंजाबजवळ आज (ता. २) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात गुजरातमधील ५८ वर्षीय मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाला. रश्मिकांत प्रमोदराय शुक्ला (रा. गांधी इंजिनिअरिंग कॅम्पस, मजूर गेट, सुरत) हे मोटरसायकल (क्र. जीजे ०५ एफडब्ल्यू ५९९९) वरून मुंबईच्या दिशेने जात असताना नियंत्रण सुटून ती घसरली. यात ते रस्त्याच्या कडेला झुडपात फेकले जाऊन गंभीर जखमी झाले. घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक विजय पहाड, उपनिरीक्षक महेंद्र पाडवी व दोन अंमलदार तत्काळ दाखल झाले. जखमींना रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनी कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवले.