मुंबई

वैतरणा नदी पात्रातून विजवाहिनी ओढण्यासाठी महावितरण कंपनीला लागले तीस तास

CD

हजारो वीज ग्राहक ३२ तास अंधारात
वीजवाहिनी ओढण्यासाठी महावितरणला लागले ३० तास; अभियंत्यांवर कारवाईची मागणी
मनोर, ता. २ : दुर्वेस गावाच्या हद्दीतील वैतरणा नदीपात्रादरम्यान वीजवाहिनी तुटल्याने ढेकाळे फिडरचा वीजपुरवठा खंडित झाला होता. हा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण कंपनीला तब्बल ३० तास लागल्याने हजारो ग्राहकांना तब्बल ३२ तास अंधारात काढावे लागले. दरम्यान, याला जबाबदार शाखा अभियंता आणि उपविभागीय अभियंत्यांविरोधात कारवाईची मागणी वीजग्राहकांकडून केली जात आहे.
बुधवारी (ता. १) वैतरणा नदीपात्रादरम्यानच्या तीनपैकी एक वीजवाहिनी तुटून पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. दुरुस्तीच्या कामादरम्यान नदीपात्रातील पाण्याच्या प्रवाहातून पलीकडे दोरखंडाच्या सहाय्याने वीजवाहिनी नेण्यात आली. यादरम्यान नदीपात्रातील खडकात वीजवाहिनी अडकून पडल्याने खांबावर बांधण्यात अपयश आले. नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह वाढला होता आणि रात्र झाल्याने वीजवाहिनी ओढण्याचे काम बंद करण्यात आले.
गुरुवारी (ता. २) सकाळी पुन्हा वीजवाहिनी ओढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने टायर ट्युबच्या सहाय्याने खडकात अडकलेली वीजवाहिनी काढण्यात यश आले आणि खांबाला जोडण्यात आली. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दुरुस्तीची कामे पूर्ण करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

मुसळधार पावसामुळे वीजवाहिन्यांमध्ये बिघाड
चार दिवसांपूर्वी शनिवार आणि रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे ढेकाळे फिडरवरील वीजवाहिन्यांमध्ये बिघाड होऊन वीजपुरवठा १२ तासांपेक्षा अधिक वेळेसाठी खंडित झाला होता.

एनडीआरएफच्या पथकाला पाचारण
तीन वर्षांपूर्वी जुलै महिन्यात वैतरणा नदीला आलेल्या पुरात नदीकाठचे खांब पडल्याने वीजवाहिन्या नदीपात्रात वाहून गेल्या होत्या. नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह अधिक असल्यामुळे नदीपात्रादरम्यानच्या वीजवाहिन्या जोडण्यासाठी महावितरण कंपनीकडून एनडीआरएफच्या पथकाची मदत घेण्यात आली होती. एनडीआरएफच्या जवानांनी स्पीड बोटीच्या सहाय्याने वीजवाहिन्या नदीपात्रातील पाण्याच्या प्रवाहातून पलीकडे पोहोचवण्याचे काम पूर्ण केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Dasara Melava: ''...ही गोष्ट मान्य केली पाहिजे'', लाडकी बहिण योजनेवरुन उद्धव ठाकरे भाजपवर बोलले

Uddhav Thackeray Dussehra Rally : उद्धव ठाकरेंचा भर पावसात दसरा मेळावा; संघ, मोदी अन् 'कमळाबाई' थेट निशाण्यावर, म्हणाले...

Dussehra Melava 2025 Live Update: मदत करणाऱ्या शिवसैनिकांचा मला अभिमान- शिंदे

Durga Visarjan Tragedy : दसऱ्याच्या उत्सवाला गालबोट, दुर्गादेवीचे विसर्जन करताना ६ तरुण बुडाले, दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ

Georai News : गेवराईच्या नदीकाठावरील त्या पूरग्रस्तांना चिखलातच दसरा साजरा करण्याची आली वेळ; चिखलाच्या खचाने साफसफाई करण्यासाठी कमी पडला अवधी

SCROLL FOR NEXT