मुंबई

विद्यार्थ्यांनी शास्वत जीवनाकडे वळावे

CD

विद्यार्थ्यांनी शास्वत जीवनाकडे वळावे
ॲड. जय पावणेकर यांचे प्रतिपादन, ‘सकाळ एनआयई’चा कर्जतमध्ये उपक्रम
कर्जत, ता. २ (बातमीदार) : शालेय जीवनात जसे त्यांच्यावर संस्कार होतात किंवा ते ज्या समाजात वावरतात, त्या समाजाकडून काय शिकतात यावर त्यांचे भविष्य अवलंबून असते. सध्याच्या काळात तर अनेकजण आभासी दुनियेतच जगत आहेत. आयुष्य उज्ज्वल बनवायचे असेल, तर आभासी दुनियेतून बाहेर पडताना शाश्वत जीवनाकडे वळावे, असे झेंडा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ॲड. जय पावणेकर यांनी सांगितले.
‘सकाळ एनआयई’तर्फे कर्जत पिंगळस येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत वाटचाल भविष्याची या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सामाजिक कार्यकर्ते बलराज पावणेकर, मुख्याध्यापक रमेश चव्हाण, अधीक्षक आर. डी. खारकांडे, बिरू होदाडे, अमोल साखरे, सीमा डोंगरे उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल आल्यामुळे त्यांचे आभासी जीवनाकडे कल वाढत चाललेला आहे. त्यामुळे भविष्यात येणाऱ्या अडचणी फार गंभीर स्वरूपाच्या असणार आहेत. एक वकील म्हणून आमच्याकडे मुलांच्या केसेस येतात तेव्हा आपला समाज कुठे चालला आहे, याचे दुःख वाटते. मला ‘सकाळ’ने आज बोलण्याची संधी दिली. त्यामुळे तुमच्याबरोबर संवाद साधत आहे. संवाद साधला तर या कार्यक्रमाचा उद्देश सफल होईल, असे मला वाटते. प्रत्येकानेच शास्वत जीवनाकडे वळणे गरजेचे आहे. तुम्ही तरुण आहात, तुम्हाला आयुष्यात पुढे जायचे असेल, तर हेल्थही महत्त्वाची आहे. त्यासाठी सकाळी व्यायाम, योगा बरोबरच खेळालाही प्राधान्य दिले पाहिजे. ज्ञान वाढीसाठी पाठ्यपुस्तकांबरोबरच वर्तमानपत्रे, ग्रंथ, वेगवेगळी पुस्तके, प्रवास वर्णने, यशस्वी व्यक्तींची जीवनचरित्रे वाचली पाहिजेत.
-------------------------------------------------------------
सकाळ एनआयईने ॲड. जय पावणेकर यांना कार्यक्रमासाठी शाळेत आणून विद्यार्थ्यांना आयुष्यात कसे पुढे जायचे. आदर्श व्यक्तिमत्त्व कसे घडवायचे याचे उत्तम मार्गदर्शन केले. सकाळ समूहाने सुरू केलेले एनआयई हे साप्ताहिक आमच्या शाळेत येते हे खरोखरच एक चांगला मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावत असल्याचे शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा पिंगळसचे मुख्याध्यापक रमेश चव्‍हाण यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: ''एवढ्या फास्ट रंग बदलणारा सरडा..'' फडणवीसांच्या लोकप्रियतेवरुन केलेल्या टीकेला एकनाथ शिंदेंचं उत्तर

Mumbai News: प्रश्न‍पत्रिका तपासणीच्या निकषांमध्ये बदल, शिक्षणात नवीन कार्यपद्धतीचे आदेश; कुणाला लागू होणार?

Eknath Shinde : केंद्राने राज्याला काय दिलं? उद्धव ठाकरेंचा सवाल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यादीच वाचून दाखवली

आर्थिक फायदा; पण सुरक्षेवर ताण येणार! दुकाने २४ तास खुली ठेवण्याचा सरकारचा प्रयोग किती यशस्वी ठरणार? वाचा पडद्यामागचं गणित

Barshi News : बार्शीच्या श्री भगवंत देवस्थानकडून शेतकऱ्यांसाठी १० लाखांचा मदतनिधी; मुख्यमंत्री सहायता निधीकडे धनादेश सुपूर्द

SCROLL FOR NEXT