गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची तक्रार आता १००वर
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाची तक्रार आता पोलिसांच्या १०० नंबरवर करता येणार आहे. प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या निर्मिती, साठवणूक, वितरण, वाहतूक किंवा विक्रीबद्दल तक्रारी करण्यासाठी नागरिकांनी हेल्पलाइन क्रमांक १०० व डायल ११२ चा वापर करावा, असे आवाहन ठाणे शहर पोलिसांनी केले आहे.
राज्यात प्रतिबंधित अन्नदार्थांच्या निर्मिती, साठवणूक, वितरण, वाहतूक किंवा विक्रीबद्दल नागरिकांनी तक्रारी नोंदविण्याकरिता अन्न व औषध प्रशासनाने टोल-फ्री क्रमांक १८००२२२३६५ कार्यन्वित केला आहे. तरी नागरिकांकडून प्रतिबंधित गुटखा, पान मसाला, सुगंधित सुपारी, सुगंधित तंबाखू असे तत्सम पदार्थांच्या विक्रीबद्दल कोणतीही तक्रार अथवा माहिती असल्यास संबंधित पोलिसांनी तत्काळ कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे.
प्रतिबंधित अन्नदार्थांची निर्मिती, साठवणूक, वितरण, वाहतूक किंवा विक्रीबद्दल कोणतीही तक्रार अथवा माहिती असल्यास त्याकरिता हेल्पलाइन कमांक १०० आणि डायल ११२ यावर संपर्क करावा, असे आवाहन ठाणे शहर पोलिसांमार्फत नागरिकांना करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्तालयाचे जनसंपर्क अधिकारी तथा वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश साळवी यांनी दिली.