मुंबई

मुंबईकरांसाठी ९८.८१ टक्के जलसाठा उपलब्ध

CD

मुंबईकरांसाठी ९८.८१ टक्के जलसाठा उपलब्ध
महापालिकेकडून पाणीपुरवठ्याचे वर्षभराचे नियोजन

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये १४ लाख ३० हजार २५१ दशलक्ष लिटर म्हणजेच ९८.८१ टक्के इतका जलसाठा उपलब्ध आहे. दरवर्षी पावसाळ्यानंतर एकूण १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर साठा आवश्यक असतो. त्यापेक्षा यंदा सुमारे १७ हजार ११२ दशलक्ष लिटरने कमी साठा उपलब्ध आहे. दरम्यान, तलाव क्षेत्रात अद्यापही पाऊस सुरू असल्याने ऑक्टोबरअखेरीस जलसाठा वाढण्याची शक्यता आहे. पाणीसाठ्याचा सविस्तर आढावा घेऊन पुढील वर्षभरासाठी पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या जल अभियंता खात्याचे प्रमुख अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी शुक्रवारी (ता. ३) सांगितले.

मुंबईसह ठाणे, भिवंडी-निजामपूर महापालिका आणि तलाव परिसरातील गावांना मिळून दररोज साधारण ४ हजार ५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे सातही तलावांतील पाणीसाठा रोजच्या वापरामुळे कमी होत असला तरी पावसाच्या सरींमुळे त्याची भरपाई होत आहे. गतवर्षी पावसाळा १५ ऑक्टोबरपर्यंत लांबला होता आणि तलाव काठोकाठ भरल्याने जलसाठ्यात जवळजवळ सहा टक्क्यांनी अधिक पाणी उपलब्ध झाले होते. यंदाही पाऊस ऑक्टोबरपर्यंत राहिल्यास पाणीसाठा वाढून आगामी वर्षभरासाठी पाणीपुरवठ्याचे नियोजन सुकर होईल, असे प्रशासनाने म्हटले आहे.

उपलब्ध पाण्याची स्थिती
तलाव जलसाठा (द.श.लि.) टक्के
अप्पर वैतरणा : २,२६,५६५. ९९.७८
मोडक सागर : १,२८,९२५ १००
तानसा : १,४२,७६९ ९८.४०
मध्य वैतरणा : १,९२,१०६ ९९.२६
भातसा : ७,०४,१४२ ९८.२०
विहार : २७,६९८ १००
तुळशी : ८,०४६ १००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump ultimatum : ट्रम्प यांचा हमासला ४८ तासांचा अल्टिमेटम! ; म्हणाले, ‘’आता जर ऐकलं नाहीतर...’’

Pune Crime : कुख्यात गुंड नीलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करणार - पोलिस आयुक्त अमितेश कुमार

Mehbooba Mufti Statement : ‘’लडाख, POKमध्ये Gen-Z… ’’ ; मेहबूबा मुफ्तींनी केलं मोठं विधान!

Gautami Patil News : गौतमी पाटीलच्या अडचणी वाढणार? ; पुणे पोलिसांनी बजावली नोटीस!

IND vs AUS: विराट कोहली आणि रोहित शर्माचे पुनरागमन होणार? ऑस्ट्रेलियाविरुद्ध ODI मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा कधी? तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT