मुंबई

सुरगड किल्ल्यावर गडपूजन उत्‍साहात

CD

सुरगड किल्ल्यावर गडपूजन उत्‍साहात
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर दुर्गवीर प्रतिष्ठानचा उपक्रम
रोहा, ता. ४ (वार्ताहर) : महाराष्ट्राच्या दुर्ग संवर्धन परंपरेला नवे आयाम देणाऱ्या दुर्गवीर प्रतिष्ठानने यंदा दसऱ्याच्या दिवशी रोहा तालुक्यातील वैजनाथ घेरासुरगड गावाजवळ असलेल्या सुरगड किल्ल्यावर गडपूजन सोहळा आयोजित करून एक अनोखा उपक्रम राबवला. आधी तोरण गडाला मग आपल्या घराला, या घोषवाक्याचा प्रत्यय या कार्यक्रमातून आला.
गेल्या १८ वर्षांपासून संस्थेचे अध्यक्ष संतोष हासुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गवीर प्रतिष्ठान अपरिचित आणि दुर्लक्षित किल्ल्यांवर गडसंवर्धनाची कामे करीत आहेत. संवर्धन करीत असलेल्या गडांचा सन्मान आणि पूजन व्हावे, या उद्देशाने दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सुरगडावर गडपूजनाचे आयोजन करण्यात आले. यासाठी सकाळी पहाटेच दुर्गवीर प्रतिष्ठानचे सदस्य, खांब पंचक्रोशीतील शिवसैनिक आणि स्थानिक ग्रामस्थ गडावर जमले. पहिल्यांदा गडदेवता आन्साईचे पूजन करण्यात आले. दिवे, मशाली प्रज्वलित करून देवीच्या मंदिरात भंडारा, गोंधळ आणि आरती झाली. त्यानंतर गडावरील मारुतीराया व शिवशंभू यांचीही पूजा-अर्चा करून पारंपरिक शस्त्र आणि गड संवर्धनासाठी लागणाऱ्या अवजारांची विधिवत पूजा करण्यात आली. गड संवर्धन ही आपली जबाबदारी आहे. आधी गडाचा सन्मान मग आपल्या घराचा उत्सव, हा दुर्गवीर प्रतिष्ठानचा संकल्प या उपक्रमातून ठळकपणे दिसून आला. उपस्थित शिवप्रेमींनी गडसंवर्धनासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार या वेळी व्यक्त केला.
...........
या कार्यक्रमाला पारंपरिक लढाऊ कलेचे अनोखे सादरीकरण विशेष आकर्षण ठरले. तळाघर गावातील भाई मोरे यांच्या शिष्यांनी लीलाधर वाळंज, जितेंद्र वाळंज, शिवंम वाळंज व अवनी माने आदींनी लाठीकाठी आणि ढाल-तलवारीचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. तसेच पुगाव गावचे मल्लखांबपटू निखिल कलमकर, ओमकार सावरकर, ऋतुराज भोईर यांनी मल्लखांबचे कौशल्य दाखवून उपस्थितांचे मन जिंकले. कामत गावचे पोलिस पाटील आनंदराव सानप यांनी दांडपट्ट्याचे प्रभावी प्रात्यक्षिक सादर केले. या कार्यक्रमाला कोलाड पोलिस ठाण्याचे नरेश पाटील, अजय लोटणकर तसेच खांब विभागीय वनाधिकारी अक्षय ताटे यांनी हजेरी लावली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला अधिक उत्साह लाभला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

Latest Marathi News Live Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT