पूरग्रस्त भागातील शालेय गळती रोखणार
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी टीजेएसबी सहकारी बँक आणि सेवा सहयोगचा विद्या ज्योती प्रकल्प
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : पूरग्रस्त भागातील एकाही विद्यार्थी-विद्यार्थिनीवर शालेय साहित्य वाहून गेल्यामुळे अथवा त्याचे नुकसान झाल्याने शाळा सोडण्याची वेळ येऊ नये याची दक्षता घेण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, टीजेएसबी सहकारी बँक आणि सेवा सहयोग फाउंडेशन यांनी संयुक्तपणे पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी विद्या-ज्योती प्रकल्प हाती घेतला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यभरासह ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात अतिवृष्टीने पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे अनेकांच्या घरात व शेतात पाणी शिरल्यामुळे शेतीसह घरातील वस्तूंचे नुकसान झाले. याची दखल घेत, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, टीजेएसबी सहकारी बँक आणि सेवा सहयोग फाउंडेशन सरसावले आहे. त्यानुसार पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पुनर्वसनाच्या प्रकल्पांतर्गत गणवेश, वह्या, पुस्तके, दप्तर, लेखन साहित्य यासह स्थानिक गरज लक्षात घेऊन अन्य वस्तूंचा समावेश असलेला एक साहित्य संच दिला जाणार आहे.
दरम्यान, या निधी संकलनात रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि टीजेएसबी सहकारी बँकेचे कर्मचारीही आप-आपला खारीचा वाटा उचलणार आहेत. या प्रकल्पाला सहाय्य करण्याचे आवाहन तिन्ही संयोजक संस्थांनी केले आहे.
लोकसहभागातून निधी संकलन
लोकसहभागातून एका विद्यार्थ्यासाठी तीन हजार एवढा निधी संकलित केला जाणार असून, तो टीजेएसबी बँकेच्या क्यूआर कोडच्या माध्यमातून संकलित केला जाईल. येत्या ७ ऑक्टोबरपासून हे निधी संकलन सुरू होत असून, पुढे नोव्हेंबर अखेरीपूर्वी मुला-मुलींना ही मदत त्यांच्या शाळेतून उपलब्ध केली जाणार आहे. महात्मा ज्योतीराव फुले यांच्या पुण्यतिथीपर्यंत म्हणजे २८ नोव्हेंबरपर्यंत विद्या ज्योती प्रकल्प पूर्ण केला जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.