३० तासांनंतर देव मंदिरात परतला
रोह्यातील धावीर महाराज पालखी सोहळ्याची सांगता
रोहा, ता.४ (बातमीदार)ः शहराचे ग्रामदैवत श्री धावीर महाराजांची शुक्रवारी पहाटे सुरू झालेल्या पालखी सोहळ्याची सांगता शनिवारी दुपारनंतर झाली. शहरात फिरून रोहेकरांना दर्शन देत तब्बल ३० तासांनंतर देव मंदिरात परतले. यावेळी रोहा पोलिसांनी महाराजांना पुन्हा सशस्त्र मानवंदना दिली. महाआरती, सेवेकऱ्यांच्या मानपानानंतर पालखी उत्सवाची सांगता झाली.
कुटुंबातील सोहळ्याप्रमाणे सर्व ग्रामस्थ एकत्र आले होते. या उत्सवात पालखीबरोबर हजारो भाविकांनी रात्र जागून काढली. समेळ वाद्य, हळगी, खालुबाजे, झांज पथके, ताशे, अलिबाग आणि रोहा येथील नगारे पथकांनी उत्सवाची शोभा वाढवली. महाराजांच्या पालखीने भक्तांच्या सोबतीने रोहा नगरीची प्रदक्षिणा पूर्ण केली. यावेळी परंपरेनुसार मंदिर ट्रस्ट, उत्सव समितीकडून रायगड पोलिस, महसूल विभाग, रोहा नगर पालिका, महावितरण विभाग, उत्सवाचे मानकरी यांनी पालखी उत्सवात अखंडपणे सेवा देणाऱ्या सेवेकऱ्यांचा नारळ भेट देऊन सन्मान केला. यावेळी पोलिस निरीक्षक मारुती पाटील, ट्रस्टचे अध्यक्ष प्रशांत देशमुख, कार्यवाह मकरंद बारटक्के, उत्सव समितीचे अध्यक्ष कुमार पाशिलकर, सरचिटणीस दर्शन कदम, माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, विश्वस्त नितिन परब, महेश सरदार, प्रकाश पवार, लालताप्रसाद कुशवाह, संदीप सरफळे, मयुर पायगुडे उपस्थित होते.
---------------------------
अनवाणी पायाने सेवा
पालखी सोहळ्यात उत्सव समितीतील पदाधिकारी, गावातील तरुण सेवेकरी तसेच धावीर भक्तांनी ३१ तास पालखी समवेत अनवाणी पायाने सेवा दिली. विविध सेवा देणाऱ्यांमध्ये तरुणांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. दोन दिवस कडक उन्हात ही मंडळी पालखी समवेत सेवा देत होती. काहींच्या पायांना छोट्यामोठ्या जखमाही झाल्या. परंतु,धावीर महाराजांचा जयघोष करीत पालखी अखंडितपणे मार्गस्थ झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.