मुंबई

पर्यटननगरीला अतिवृष्टीचा फटका

CD

पर्यटननगरीला अतिवृष्टीचा फटका
जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस, शेतकरी, मच्छीमारांचे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ४ : पाच महिन्यांपासून जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपले आहे, पण पर्जन्यमानाची सरासरी यंदा दरवर्षीपेक्षा १६ टक्क्यांनी कमी असल्याची आकडेवारी आहे. त्यामुळे एकीकडे पर्जन्यमान घटले असले तरी अतिवृष्टीने शेतकरी, मच्छीमार, पर्यटनाला मात्र फटका बसला आहे.
मे महिन्यात पडलेल्या पावसाचा आंबा बागायतदारांना मोठा फटका बसला होता. त्याचबरोबर मच्छीमारांनाही शेवटच्या मासेमारी हंगामाचा फायदा उचलता आलेला नाही, मात्र या नुकसानीची कोणतेही मोजमाप नसल्याने आर्थिक नुकसान सोसावा लागत आहे. यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात मोठे पूर आले नाहीत. मोठी नैसर्गिक आपत्ती आली नाही तरी पावसाळ्यात ५२३ पक्क्या घरांचे, ९२ कच्च्या घरांचे, २० झोपड्यांचे नुकसान झाले. १२ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले, तर चार जणांचा मृत्यू झाला. तसेच पावसाने दोन हजार १८५ हेक्टर क्षेत्रावरील भातशेतीचे नुकसान केले.
----
महिना पडलेला पाऊस सरासरी
मे ४५४.९५ १४.६७
जून ६९७.०० १०७.१
जुलै ७६३.६ ६३.४
ऑगस्ट ७४४.२ ८५.००
सप्टेंबर ४२९ १०४
रायगड जिल्ह्यात ९७.७४ टक्के पाऊस पडला.
---
दक्षिणेपेक्षा उत्तरेत जास्त पाऊस
यंदा दक्षिण रायगडपेक्षा उत्तर रायगडात जास्त पाऊस पडला. अलिबाग, उरण, पेण, मुरूड या चार तालक्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. अलिबाग तालुक्यात सरसरीच्या १११.५ टक्के पावासची नोंद झाली आहे. उरणमध्ये ११६.९ टक्के, पेण तालुक्यात १०१.७ टक्के तर मुरूडमध्ये १०६ . ५ टक्के पाऊस पडला. पोलादपूर तालुक्यात सरासरीच्या ७२.८ टक्के कमी पाऊस पडला आहे.
----
मॉन्सूनच्या कालावधीवरून नोंद
१ जून ते ३० सप्टेंबर हा मॉन्सूनचा कालावधी समजला जातो. शासनाकडे चार महिन्यांच्या मॉन्सूनचा पाऊस म्हणून नोंद केली जाते. या चार महिन्यांमध्ये रायगड जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान तीन हजार १४८.६ मिलिमीटर आहे. जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत २६२६.८ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला. वार्षिक सरासरीच्या ८३.७ टक्के पाऊस पडला आहे. यंदा चार महिन्यांमध्ये वार्षिक सरासरीच्या १६ टक्के कमी पाऊस पडला आहे.
...........................
तालुकानिहाय आकडेवारी
तालुका पावसाची टक्केवारी
अलिबाग १११.५
पनवेल ९२.९
कर्जत ७४.१
खालापूर ९०.००
उरण ११६.९
सुधागड ८०.८
पेण १०१.७
महाड ८३.१
माणगाव ८०.३
रोहा ९३.७
पोलादपूर ७२.८
मुरूड १०६.५
श्रीवर्धन ९४.३
म्हसळा ९३.७
तळा ९३.१
एकूण ८३.७ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

Latest Marathi News Live Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT