नवी मुंबईत यंदा कमी पावसाची नोंद
तुर्भे, ता. ५ (बातमीदार): नवी मुंबईत यंदा पाऊस समाधानकारक असला तरी मागील वर्षीच्या तुलनेत कमी नोंद झाला आहे. मागील वर्षी नवी मुंबईत विक्रमी ३९५९.६० मिमी पावसाची नोंद झाली होती, तर यंदा एक जून ते ३० सप्टेंबर दरम्यान ३२९६.१३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरण क्षेत्रात मात्र ४०६५.६ मिमी पावसाची नोंद झाला असून, मोरबे धरण १०० टक्के भरले आहे.
नवी मुंबई हे कोकण किनाऱ्याजवळ असल्याने येथे सरासरी २५०० ते ३००० मिमी पावसाची अपेक्षा असते; मात्र यंदा मागील वर्षांच्या तुलनेत पाऊस कमी पडला आहे. यंदा शहरात आतापर्यंत २३५९.१३ मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर २०१९ मध्ये विक्रमी ४४१९.११ मिमी पावसाची नोंद झाली होती. पावसाच्या पहिल्या टप्प्यात बेलापूर आणि सीबीडी परिसर पाण्याखाली गेल्याने पूरप्रसंग निर्माण झाला होता. मोरबे धरणाचे पाणी साठा १००.३५% असून, २० ऑगस्ट २०२५ रोजी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. याआधी २०१८, २०१९, २०२१ आणि २०२४ मध्येही धरण पूर्ण भरले होते, तर २०२०, २०२२ आणि २०२३ मध्ये अपूर्ण होते.
पावसाची नोंद
वर्ष सरासरी पाऊस (मी.मी.)
२०१५ १६१४.०४
२०१६ २७०६.४२
२०१७ ३१२३.७८
२०१८ २६३६.७८
२०१९ ४४१९.११
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.