मुंबई

सेंट ऑगस्टिन हायस्कूलमध्ये आजी-आजोबा दिन उत्साहात

CD

सेंट ऑगस्टिन हायस्कूलमध्ये आजी-आजोबा दिन उत्साहात
नेरूळ, ता. ५ (बातमीदार) ः सेंट ऑगस्टिन हायस्कूल, नेरूळ येथे शनिवारी (ता. ४) हृदयस्पर्शी आजी-आजोबा दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवनात आजी-आजोबांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात प्रभू प्रार्थना, बायबल वाचन आणि विशेष उपासनेने झाली. इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. विद्यार्थ्यांनी कोळी नृत्य, मेलडी नृत्य आणि आजी-आजोबांना समर्पित संगीतमय ऑर्केस्ट्राद्वारे भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले.
आजी-आजोबांनीही विविध खेळांत उत्साहाने भाग घेतला. विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या शुभेच्छापत्रांचे वितरण करून प्रेम आणि कृतज्ञतेची अभिव्यक्ती केली. मुख्याध्यापिका समीरा माने यांनी आजी-आजोबांना शुभेच्छा देत मुलांच्या संगोपनात त्यांची भूमिका अधोरेखित केली. या सोहळ्याने सर्वांच्या मनात गोड आठवणी आणि पिढ्यांतील बंध अधिक दृढ केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

Crime: पक्षातील सदस्याला अडकवण्यासाठी घरात स्फोटके आणि दारू ठेवली, पण काँग्रेस नेता स्वत:च अडकला अन्...; काय घडलं?

दुर्दैवी घटना! 'सख्ख्या काकाच्या पिकअपखाली सापडून चिमुरड्याचा मृत्यू'; आंबेगाव तालुक्यातील घटना, कुटुंबीयांचा आक्रोश

INDW vs PAKW सामन्यात वाद! पाकिस्तानी फलंदाज विकेटनंतरही मैदान सोडेना, कर्णधाराचीही अंपायरसोबत चर्चा; भारताचं मात्र सेलिब्रेशन

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

SCROLL FOR NEXT