करमाळ्यातील पूरग्रस्तांना प्रकाश सुर्वे यांची मदत
मुंबई, ता. ५ : राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी करुणा सेवा ट्रस्टच्या सहकार्याने करमाळा तालुक्यातील (जि. सोलापूर) पूरग्रस्त नागरिकांसाठी ३००० जीवनावश्यक साहित्याचे संच पाठवले.
या किटमध्ये २७ प्रकारच्या वस्तूंसह चांगल्या दर्जाचे कपडे व शालेय दप्तर, पाच किलो तांदूळ, डाळ, पीठ, साखर, तेल, मीठ आणि दर्जेदार स्टीलच्या भांड्यांचा समावेश होता. हे संच घेऊन दोन ट्रक काल करमाळ्यास रवाना झाले. या उपक्रमात आमदार प्रकाश सुर्वे, उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे,माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ, युवा सेना कार्यकारिणी सदस्य राज प्रकाश सुर्वे, महिला विभागप्रमुख मीनाताई पानमंद, महिला विधानसभा संघटक शिलाताई गांगुर्डे, विभागप्रमुख मनोहर देसाई यांच्यासह विभाग क्रमांक १ च्या पदाधिकाऱ्यांनी स्वतः सहभाग घेतला.
इतके वर्षे शेतकऱ्यांनी आम्हाला तारले, आता त्यांच्या कठीण प्रसंगी त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहाणे ही केवळ माझी सामाजिक जबाबदारी नव्हे, तर मानवी कर्तव्यभावना आहे, असे प्रतिपादन आमदार सुर्वे यांनी केले. तसेच, पूरग्रस्तांच्या घरापर्यंत मदत पोहोचवण्याचे निर्देश कार्यकर्त्यांना दिले. महाराष्ट्रात कुठेही संकट आलं तरी शिवसेना जनतेच्या सेवेसाठी नेहमी तत्पर राहील, असेही ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.