मुंबई

ठाण्यात कर्करोगाला मात दिलेल्या २०० योद्धांचा सन्मान..

CD

ठाण्यात २०० कर्करोग योद्धांचा सन्मान
आशा कॅन्सर ट्रस्ट आणि रिसर्च सेंटरच्या वतीने प्रेरणादायी उपक्रम
ठाणे, ता. ५ (बातमीदार) : कर्करोगाचे निदान होताच रुग्णच नव्हे तर त्यांचे कुटुंबही हादरून जातात. वेदनादायी उपचाराने शरीरासोबत मनावरही घात होतो, पण जीवन-मरणाच्या दारात असतानाही योग्य उपचार आणि मनोबलाच्या जोरावर कर्करोगावर मात करता येऊ शकते. अशाच पद्धतीने कर्करोगाशी युद्ध जिंकलेल्या दोनशे युद्धांचा ठाण्यात कॅन्सर रुग्ण रोझ डे यानिमित्ताने सन्मान करण्यात आला.
आशा कॅन्सर ट्रस्ट आणि रिसर्च सेंटरच्या वतीने ५ ऑक्टोबर रोजी ठाण्यातील थोरले बाजीराव पेशवे हॉलमध्ये ‘मिशन कॅन्सर दूर’ या थीमवर आधारित २२ वा कॅन्सर रुग्ण रोज डे कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात कॅन्सरवर विजय मिळवलेल्या २०० पेक्षा जास्त रुग्णांचा सन्मान करण्यात आला.
ज्यांनी कॅन्सरवर मात करून आयुष्यात नवा उत्साह आणला आहे, कॅन्सरमधून पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांना त्यांच्या धैर्याबद्दल आणि संघर्षाबद्दल या कार्यक्रमातून सलाम करण्यात आला. या आनंदोत्सवात रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि आशा कॅन्सर हॉस्पिटलचे कर्मचारी यांच्यासह एकत्रितपणे कार्यक्रम सादर करण्यात आले. आशा कॅन्सर ट्रस्टचे प्रमुख व कर्करोगतज्ज्ञ डॉ. सतीश कामत, केईम हॉस्पिटलच्या इन्चार्ज डॉक्टर शिल्पा राव, डेंटल व प्लास्टिक सर्जन मनीष भानुषाली यांसारख्या मान्यवरांनी उपस्थितांना कॅन्सरबद्दलची भीती दूर करण्याचे उपदेश दिले आणि बरे झालेल्या रुग्णांचे मनोधैर्य वाढवले.

कॅन्सरवर मात केलेल्या महिलांच्या प्रतिक्रिया :
एस्थर चेट्टीयार म्हणतात, स्तनाचा कॅन्सर असल्याचे समजताच मी फार रडले, पण डॉक्टर कामत यांचे समुपदेशन मिळाल्यानंतर भीती दूर झाली आणि आता मी माझे जीवन आनंदाने जगत आहे.
वंदना विचारे यांनी सांगितले, २०१७ मध्ये स्तनाचा कॅन्सर झाला होता. त्या वेळी भीती वाटली, पण उपचारांनंतर आता ७५ वर्षांची असूनही मी निरोगी आहे.
प्रगती तावरे यांनी म्हटले, घशाचा कॅन्सर झाला होता, पण डॉक्टरांचा सल्ला व कुटुंबाचा आधार मिळाल्यामुळे मी बरे झाले.
ए डी गंद्रे, चारुशीला जोशी, पुष्पलता ठाणेकर, अरुणा जोशी यांनी कॅन्सरवर उपचार घेतल्यावर नवीन आयुष्य मिळाल्याचा अनुभव सांगितला आणि कॅन्सरग्रस्तांना सकारात्मक राहण्याचा सल्ला दिला.

कॅन्सर महिलांमध्ये अधिक प्रमाणात
डॉ. सतीश कामत म्हणाले, स्तनाचा व गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो, पण घाबरायची काहीच गरज नाही. कॅन्सरच्या कोणत्याही टप्प्यावर योग्य उपचार घेतल्यास बरे होणे शक्य आहे. अनेक जण पाच ते दहा वर्षे कॅन्सरमुक्त जीवन जगत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

INDW vs PAKW सामन्यात वाद! पाकिस्तानी फलंदाज विकेटनंतरही मैदान सोडेना, कर्णधाराचीही अंपायरसोबत चर्चा; भारताचं मात्र सेलिब्रेशन

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

Chemical factory Fire:'रासायनिक कारखान्यातील आग २४ तासांनी आटोक्यात'; ३० बंब पाणी, अग्निशामक रसायनाचा वापर

Wonderful journey: 'कालीच्या रूपात ३३०० कि.मी.वाट तुडवत येतोय तुळजापूरला'; हैदराबादच्या बाबूराव पेंटय्यांचा चार वर्षांपासून प्रवास

SCROLL FOR NEXT