सहा कोटींच्या कर्ज देण्याचे आमिष दाखवून फसवणूक
पतंस्थेच्या चेअरमनसह चौघांविरोधात गुन्हा दाखल
नवी मुंबई, ता. ५ (वार्ताहर) : सहा कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून सीबीडी बेलापूर येथील पतसंस्थेच्या चेअरमनसह चौघांनी मुंबईतील एका गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून कमिशन स्वरुपात २७ लाख रुपये उकळून त्यांना कर्ज न देता त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सीबीडी पोलिसांनी या पतसंस्थेच्या चेअरमनसह चौघा जणांविरोधात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
या प्रकरणात तक्रारदा राजेंद्र ससाणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी नेवाळी (पनवेल) येथील जमिनीचा व्यवहार करुन बोधिवृक्ष को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी स्थापन करण्याचे नियोजन केले होते. या प्रकल्पासाठी निधीची आवश्यकता असल्याने ससाणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आर्किटेक्ट मंगेश शिरोळे यांच्याकडे वित्तपुरवठा मिळविण्यासाठी मदत मागितली होती. शिरोळे यांनी गुंतवणूकदार शोधून देतो, असे सांगत २.२५ लाख रुपये कमिशन घेतले होते. त्यानंतर शिरोळे यांनी सीबीडी बेलापूर सेक्टर-११ मधील पतंगराव कदम नागरी पतसंस्था (मर्यादित) या संस्थेचे चेअरमन आनंद पगारे यांच्याशी ओळख करून दिली होती. पगारे यांनी सोसायटीला सहा कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याचे कबूल करून कमिशन म्हणून २४ लाख रुपयांची मागणी केली. तसेच व्हेरिफिकेशनसाठी आलेल्या अभिषेक गुरव याने चांगला रिपोर्ट देण्यासाठी ५० हजार रुपये घेतले. त्यानंतर आनंद पगारे यांनी बनावट सॅन्क्शन लेटर व डीडी (डिमांड ड्राफ्ट) देत लोन मंजूर झाल्याचे भासवले. तसेच कुर्ला शाखेत सदर डीडी जमा करण्यास सांगून तीन दिवसांत आरटीजीएसद्वारे रक्कम पाठवित असल्याचे सांगितले. मात्र डीडी जमा केल्यानंतर देखील सोसायटीच्या खात्यात एकही रुपया त्यांच्या खात्यात जमा झाला नाही. उलट ससाणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी २० लाख रुपये रोख आणि ३ लाखांचा चेक (इंडियन व्हेईकल सोल्युशन नावाने) असा एकूण २३ लाख रुपयांचा व्यवहार पगारे यांच्याकडे केला. त्यानंतर पतसंस्थेचा कर्मचारी असल्याचे सांगणाऱ्या सुरेश राठोड याने लोन ट्रान्सफरसाठी आणखी १.३४ लाख रुपये, तर गुरव यांनी व्हेरिफिकेशनसाठी घेतलेले ५० हजार रुपये असे एकुण २७. ९ लाख रुपये या चौघांनी या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून उकळले. काही दिवसांनी लोन रद्द करण्याच्या बहाण्याने पगारे यांनी फॉर्म घेतला आणि पैसे परत देतो असे सांगितले. मात्र पगारे यांनी फक्त १२. ५ लाख रुपयेच परत केले. उर्वरीत १४ लाख ५९ हजार अद्यापपर्यंत परत दिले नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.