मुंबई

मराठी चित्रपटाला स्क्रीन न दिल्यास ‘खळ्ळ खट्याक’चा इशारा

CD

अंबरनाथ, ता. ५ (बातमीदार) : अंबरनाथमध्ये मराठी चित्रपटाला स्क्रीन उपलब्ध न केल्यास मनसे स्टाईलने खळ्ळ खट्याक आंदोलन करण्याचा इशारा मनसेने मिराज चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनाला दिला आहे.
कोकणच्या सौंदर्यावर आधारित ‘छबी’ मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. मुंबई आणि इतर ठिकाणी या चित्रपटाचे प्रदर्शन सुरू असतानाच अंबरनाथमधील मिराज चित्रपटगृहात अचानक प्रदर्शन थांबवण्यात आले. या आधी चित्रपटाच्या निर्मात्या, अभिनेते आणि टीमने अंबरनाथ स्पोर्ट्स क्लबच्या नवरात्रोत्सवाला भेट देऊन या परिस्थितीची माहिती शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांना दिली होती. यावरून शनिवारी शिर्के यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने व्यवस्थापकांची भेट घेतली. त्यांनी ‘छबी’ चित्रपटाला त्वरित स्क्रीन उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच मराठी चित्रपटाला दुजाभाव केला तर चित्रपटगृह फोडण्यात येईल, असा इशारा यावेळी मनसेच्या वतीने चित्रपटगृहाला दिला. चित्रपटगृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या बाबी समजावून सांगितल्यावर मराठी चित्रपटांसाठी स्क्रीन उपलब्ध करून देण्याची सकारात्मक भूमिका व्यवस्थापनाने दर्शवल्याचे शिर्के यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

Crime: पक्षातील सदस्याला अडकवण्यासाठी घरात स्फोटके आणि दारू ठेवली, पण काँग्रेस नेता स्वत:च अडकला अन्...; काय घडलं?

दुर्दैवी घटना! 'सख्ख्या काकाच्या पिकअपखाली सापडून चिमुरड्याचा मृत्यू'; आंबेगाव तालुक्यातील घटना, कुटुंबीयांचा आक्रोश

SCROLL FOR NEXT