मुंबई

श्वेत क्रांतीला उतरती कळा

CD

दुग्धव्यवसायाला उतरती कळा
शासकीय संकलन केंद्रे भकास अवस्थेत
खालापूर, ता. ६ (बातमीदार)ः महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी खेडोपाडी शेतीवर अवलंबून असलेल्या बळीराजाचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजना राबवल्या. शेतीला जोडधंदा असलेल्या दुग्धव्यवसायाला चालना देण्यासाठी शासकीय दुग्धालये स्थापन करण्यात आली. पण दुग्धालये बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने शेतीला पूरक अशा व्यवसायालाच उतरती कळा लागली आहे.
रायगड जिल्ह्यात खालापूर आणि महाड येथे १९६०च्या सुमारास डेअरी सुरू झाली. सुरुवातीला खालापुरात विठ्ठल मंदिरानजीक, नंतर स्थलांतर होऊन खोपोली शिळफाटा येथे हलवण्यात आली. शिळफाटा येथे साडेसात एकर जागेत सुसज्ज डेअरीतून दिवसाला १० हजार लिटर पिशवी बंद दूध रायगड, मावळसह मुंबईत वितरण होत होते. जिल्ह्यातील कर्जत, पाली, नागोठणेसह विविध भागांतील दूध संकलन खोपोली येथे केले जात होते. तर घाटमाथ्यावरून टॅंकरमधून आणलेल्या दुधावर प्रक्रिया करून पिशवी बंद केले जात होते. पण नव्वदच्या दशकात खासगी संस्थांचा शिरकाव शासकीय दुग्धालयासाठी मारक ठरला. शासनाच्या उदासीनतेमुळे महाडपाठोपाठ खोपोलीतील डेअरी बंद झाल्याने शेतकरी, छोट्या व्यावसायिकांना त्याचा फटका बसला.
--------------------------------------
भेसळयुक्त दुधाची विक्री
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत मोक्याच्या ठिकाणी साडेसात एकर जागा डेअरीची आहे. २०२२ साली डेअरी पूर्णपणे बंद करण्यात आली. यंत्रसामुग्री भंगारात काढण्यात आली. सध्या डेअरीभोवताली गवत, झाडेझुडपे वाढली असून या ठिकाणी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वसतिगृहासाठीच्या जागेचा प्रस्ताव असल्याची माहिती मिळाली आहे. डेअरी बंद झाल्याने अनेकांनी दुभती जनावरे विकून कारखान्याची वाट पकडली. दुधाचा तुटवडा जाणवत असून, कर्नाटक राज्यातून दूध मोठ्या प्रमाणात येते. तर काही ठिकाणी भेसळयुक्त दूध मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याची माहिती आहे.
--------------------------------------
फक्त पोलादपूरमधूनच पुरवठा
शेती व्यवसायाबरोबरच दुग्धव्यवसायाशीही येथील शेतकऱ्यांनी फारकत घेतल्याचे दिसून येत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे दुधाच्या बाबतीत स्वयंपूर्ण असून, एकूण दुधाच्या आठ टक्के दूध या दोन जिल्ह्यांतून येत असते. तर उर्वरित मागणीसाठी कोल्हापूर, सातारा, पुणे यासारख्या जिल्ह्यांवर अवलंबून राहावे लागते. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुका दुसऱ्या तालुक्यांना दुधाचा पुरवठा करीत आहे, मात्र त्याचे प्रमाण अत्यल्प आहे.
-------------------------------------------
लोकसंख्या वाढत असताना पुरवठा कमी होत आहे. रोजगार सहज उपलब्ध होत असल्याने काहीसे श्रमिक क्षेत्र असणाऱ्या व्यवसायाकडे शेतकरी आकर्षित होत नाहीत. वर्षभर आवश्यक असणारा हिरवा चारा नसल्याने त्याचा व्यवसायावर परिणाम होत आहे.
- सुदर्शन पाडावे, सहाय्यक निबंधक, दुग्धविकास विभाग
------------------------------------------
दुधाचा तुटवडा
तालुका लिटर
अलिबाग २२,२३६
पनवेल ९४,६१८
पेण १३,८०१
कर्जत २,८५७
रोहा १२,१२४
खालापूर १०,४६३
माणगाव ६,६२३
सुधागड ४२९.५
मुरूड ६.५४१.५
पोलादपूर/जादा ९९०
महाड १५
उरण १८,०२१
तळा २,३५४
श्रीवर्धन ३,९३७
म्हसळा २,८०४.५
एकूण १,९५,८३४.५६ ६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगातला सगळ्यात मोठा डॉन; 'मुळशी पॅटर्न'प्रमाणेच बकासूर झाला अन् अमेरिकेच्या जेलमध्ये तडफडून मेला

Lawyer Rakesh Kishor: मोठी बातमी! सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलावर कारवाई; बार कौन्सिलने घेतला मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : खासदर शोभाताई बच्छाव यांचा पाचोरा तालुक्यातील पाहणी दौरा पूर्ण

Akola News : आरक्षण जाहीर! कुठे धक्का तर कुठे मिळाली संधी; जिल्ह्यातील पाच नगराध्यक्ष पदांवर महिलाराज

Kannad Nagarparishad Election : कन्नड नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव; शहरात ‘भावी वहिनीसाहेब’ ताईसाहेब चर्चेत

SCROLL FOR NEXT