मुंबई

६ वर्षांच्या विवानचा विश्वविक्रम

CD

सहा वर्षांच्या विवानचा ‘विश्वविक्रम’
फक्त सहा मिनिटांत १९५ देशांचे ध्वज ओळखून नवी मुंबईचे नाव जगभरात उंचावले
नवी मुंबई, ता. ६ (वार्ताहर) : वाशीतील अवघ्या सहा वर्षांच्या चिमुकल्या विवान अग्रवालने अवघ्या सहा मिनिटात अनोखा विश्वविक्रम करत नवी मुंबईचे नाव जगभरात केले आहे. विवानने सहा मिनिट १६ सेकंदात जगभरातील १९५ देशांचे ध्वज अचूक ओळखून जागतिक विक्रम प्रस्थापित केला. विवानच्या या विक्रमाची नोंद इन्जिनियस चार्म वर्ल्ड रेकॉर्ड्स, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली आहे. इतक्या लहान वयात हा विक्रम करणारा तो देशातील सर्वात लहान विजेता ठरला आहे. विवानच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अव्हालॉन हाइट्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये दुसरीमध्ये शिकणारा हा विवानला लॅपटॉपच्या स्क्रीनवर जगभरा
तील ध्वज दाखविण्यात आले. या ध्वजांची झटपट ओळख करत विवानने देशांची अचूक नावे सांगत गेला आणि पाहता पाहता जगातील सर्व देशांवर आपला ज्ञानध्वज फडकावला. या विलक्षण कामगिरीला ऑल इंडिया स्पोर्ट्स अँड रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीज क्लब (एआयएसआरएसी)चे अध्यक्ष आनंद राजेन्द्रन यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकृत मान्यता मिळाली आहे.
विवानच्या नावाची नोंद इन्जिनियस चार्म वर्ल्ड रेकॉर्ड्स, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली असून, इतक्या लहान वयात हा विक्रम करणारा तो देशातील सर्वात लहान विजेता ठरला आहे.

लहानसा विश्वदूत
विवानच्या या बुद्धिमत्तेच्या झळाळीमागे, त्याची जिज्ञासू वृत्ती, तीक्ष्ण स्मरणशक्ती आणि शिकण्याची अखंड ओढ आहे. जगातील भौगोलिक विविधतेबद्दल त्याची आवड पाहता शिक्षकांनी त्याला लहानसा ग्लोबल सिटीझन असे नाव दिले आहे. शाळेचे शिक्षक, त्याच्यासह शिकणारे विद्यार्थी आणि पालक मंडळींनी विवानचे कौतुक करत त्याला नवी मुंबईचा लहानसा विश्वदूत म्हटले आहे.

पालकांना आनंद
त्याचे पालक सपना अग्रवाल आणि राजकुमार अग्रवाल यांनी आपल्या मुलाच्या या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. विवानचे जगाबद्दलचे कुतूहल आणि शिकण्याची आवड त्याला मोठ्या उंचीवर नेईल, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S.T. Workers: दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा इशारा; मशाल मोर्चा निघणार, नेमक्या मागण्या काय?

Mayawati on Bihar Election : बिहार निवडणुकीसाठी मायावतींनी घेतला मोठा निर्णय ; ट्वीटद्वारे 'बसपा'ची भूमिका जाहीर!

Pune News : महापालिका निवडणुकीसाठी ५ हजार मतदान केंद्र

Pune Water Close : पुणे शहराच्या बहुतांश भागात गुरुवारी पाणी पुरवठा राहणार बंद

जगातला सगळ्यात मोठा डॉन; 'मुळशी पॅटर्न'प्रमाणेच बकासूर झाला अन् अमेरिकेच्या जेलमध्ये तडफडून मेला

SCROLL FOR NEXT