मुंबई

निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग

CD

निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग
उमेदवारांमधील आरक्षण सोडतीची प्रतीक्षा शिगेला
अलिबाग, ता. ७ (वार्ताहर)ः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धावपळ आता सुरू झाली असून, सोमवारी (ता. १३) जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांच्या आरक्षण सोडतीची प्रतीक्षा शिगेला पोहोचली आहे. जिल्हा परिषदेसाठी जिल्हाधिकारी तर पंचायत समित्यांसाठी तहसीलदार सोडत काढणार असून, २७ ऑक्टोबरपर्यंत अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
रायगड जिल्ह्यात शिवसेनेने महायुती करणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस संयमाची भूमिका घेत आहे. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवार संभ्रमात आहेत. काही नेते स्वबळावर लढण्याचा इशारा देत आहेत. जिल्ह्यात सर्वच पक्षांनी भेटीगाठी, कार्यकर्त्यांची चाचपणी आणि तयारीला वेग दिला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण आरक्षण यापूर्वीच जाहीर झाले आहे. रायगड जिल्ह्यात सध्या ५९ जिल्हा परिषद आणि ११८ पंचायत समिती मतदारसंघ आहेत. मतदारसंघांच्या संख्येत वाढ झाली नसल्याने काही इच्छुक उमेदवारांनीमध्ये नाराजी आहे. तर भौगोलिकदृष्ट्या मोठे आणि लोकसंख्येच्या तुलनेत अवाढव्य असलेल्या काही मतदारसंघांतून उमेदवारांना मेहनतीबरोबर खर्चही करावा लागणार आहे.
-------------------------------------
राजकीय समीकरणे बदलणार
- रायगड जिल्ह्याचे राजकीय चित्रही बहुरंगी आहे. पनवेल, उरण आणि पेण या तालुक्यांत भाजपचे निर्विवाद वर्चस्व असून, महाड, अलिबाग, कर्जतमध्ये शिवसेना आघाडीवर आहे. श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार असून, खासदार म्हणून सुनील तटकरे कार्यरत आहेत. शिवसेनेचे भरत गोगावले आणि राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंकडे मंत्रिपद आहे. त्यामुळे महायुतीत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
- गेल्या साडेतीन वर्षांपासून ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर या निवडणुका रखडल्या होत्या. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारीपूर्वी निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याने आता निवडणूक आयोग सज्ज झाला आहे. जिल्हाभरातील सर्व राजकीय पक्षांनी संघटनात्मक बैठका, कार्यकर्त्यांची चाचपणी, प्रचार यंत्रणा उभारणीला प्रारंभ केला आहे. १३ ऑक्टोबरला होणाऱ्या सोडतीनंतर राजकीय रणसंग्राम सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत.
----------------------------------
जिल्हा परिषदेसाठी रस्सीखेच
काही महिन्यांपासून महायुतीतील मित्रपक्षांत मंत्रिपदे, विकासकामे, श्रेयवादावरून ठिणग्या उडत आहेत. त्यातच रायगड जिल्ह्यात महायुतीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद अनेकदा समारे आले आहेत. आता रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेत अंतर्गत रस्सीखेच सुरू झाली आहे. आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नीसह शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजा केणी आणि रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांचे नाव घेतले जात आहे. अध्यक्षपदावरून होणाऱ्या अंतर्गत कलहाचे वादळ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hingoli: चक्क शिक्षणाधिकारीच बसणार शाळेसमोर उपोषणाला; कारण वाचून धक्का बसेल...

ओमानमधील ३६ भारतीयांची सुटका, नियोक्त्याने केलं शोषण; केंद्र सरकारला कळताच...

Moto G06 Power Price : मोटोरोलाने भारतात लॉन्च केला बजेट मोबाईल; चक्क 7000mAh बॅटरी अन् दमदार फीचर्स, किंमत फक्त 7,499

Pune News : एकाच दिवसांत धनादेश वटविण्याच्या निर्णयामुळे बँकिंग क्षेत्रात गोंधळ; खातेदार आणि कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी

Pune Crime : टिपू पठाण टोळीतील गुन्हेगारांची बँक खाती गोठवली; लाखोंचा मुद्देमाल जप्त, बेकायदेशीर बांधकामे तोडण्याची कारवाई सुरू

SCROLL FOR NEXT