मुंबई

उर्दू साहित्य कला अकादमीच्या सुवर्णमहोत्सवी समारोहाचे उद्‌घाटन

CD

उर्दू साहित्य कला अकादमीच्या सुवर्णमहोत्सवी समारोहाचे उद्‌घाटन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : उर्दू ही फक्त भाषा नाही, ती संस्कृतीचा सुगंध, विचारांचा सेतू आणि आत्म्याचा आवाज आहे, असे प्रतिपादन अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले. राज्य उर्दू साहित्य अकदमीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त वरळी डोम येथे तीनदिवसीय साहित्यिक व सांस्कृतिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याचे उद्‌घाटन मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले. या वेळी माजी मंत्री नवाब मलिक, पटकथा लेखक जावेद अख्तर यांच्यासह आमदार व साहत्यिक उपस्थित होते.
या वेळी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महान विभूतींनी समाज उन्नतीसाठी कार्य करताना सर्वसमावेशकता, शिक्षण, भाषेचा विकास आणि संस्कृती संवर्धन यासारख्या मूल्यांची परंपरा निर्माण केली. त्यांच्या विचारांच्या प्रभावामुळेच उर्दूसह सर्व भाषांना महाराष्ट्रात मानाचे स्थान लाभले. या आदर्शांच्या प्रेरणेनेच आज उर्दू भाषेच्या सुवर्ण प्रवासाचा सोहळा होत आहे.
१९७५मध्ये स्थापन झालेल्या या अकादमीचा उद्देश उर्दूतील नाट्यमहोत्सव, पुस्तके, पत्रकार, ग्रंथालय, लेखक, कवी यांना प्रोत्साहन देणे हा अकादमीचा उद्देश आहे. गत चार वर्षांतील २०० लेखक, कवी आणि ४८ पुस्तकांच्या लेखकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे, अशी माहिती अल्पसंख्याक विभागाचे सचिव रुचेश जयवंशी यांनी दिली.


उर्दू घर योजना
मराठी व उर्दू साहित्यिक देवाणघेवाणीसाठी सांस्कृतिक केंद्रे म्हणजे उर्दू घर योजना आहे. हे उर्दू घर अद्ययावत बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील. उर्दू घर योजनेअंतर्गत नांदेड, मालेगाव, जळगाव, सोलापूर, नागपूरमध्ये उभारणी सुरू आहे. राज्यात १,८०० उर्दू शाळांत नऊ लाख विद्यार्थ्यांना उर्दू शिकविले जाते. ‘Urdu Learning App’द्वारे दरवर्षी ५० हजार विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले जाते. तीन वर्षांत १०० जिल्हास्तरीय साहित्य संमेलने घेतली गेली आहेत.
....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hingoli: चक्क शिक्षणाधिकारीच बसणार शाळेसमोर उपोषणाला; कारण वाचून धक्का बसेल...

ओमानमधील ३६ भारतीयांची सुटका, नियोक्त्याने केलं शोषण; केंद्र सरकारला कळताच...

Moto G06 Power Price : मोटोरोलाने भारतात लॉन्च केला बजेट मोबाईल; चक्क 7000mAh बॅटरी अन् दमदार फीचर्स, किंमत फक्त 7,499

Pune News : एकाच दिवसांत धनादेश वटविण्याच्या निर्णयामुळे बँकिंग क्षेत्रात गोंधळ; खातेदार आणि कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी

Pune Crime : टिपू पठाण टोळीतील गुन्हेगारांची बँक खाती गोठवली; लाखोंचा मुद्देमाल जप्त, बेकायदेशीर बांधकामे तोडण्याची कारवाई सुरू

SCROLL FOR NEXT