कळव्यातून ६६ वर्षीय जेष्ठ नागरिक हरविले
कळवा, ता.७ (बातमीदार) ः कळव्यातील पारसिक नगर येथील मैत्री वाटिका गृह संकुलनातील चंदन इमारतीत राहणारे विजय वसंत गावडे (वय ६६) हे १५ सप्टेंबरला आपल्या राहत्या घरातून सकाळी सहाच्या सुमारास निघून गेले आहेत ते अजून घरी परत न आल्याने त्यांचे कुटुंब चिंतेत आहे या संदर्भात कळवा पोलिस ठाण्यात १६ सप्टेंबरला हरविल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे विजय गावडे हे अंगाने मध्यम असून रंग सावळा, चेहरा उभट, उंची ५ फूट ६ इंच व अंगात राखाडी रंगाचा टी शर्ट,फुल पँट असा पोशाख परिधान केला आहे ते कुठे सापडल्यास कळवा पोलिस ठाण्यातील क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आवाहन कळवा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक योगेंद्र चव्हाण यांनी केले आहे.