मुंबई

महामार्गावरील पुलावर धोकादायक वाहतूक

CD

कासा, ता. ८ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील आंबोलीजवळील करंजविरा नदीवरील पूल सध्या अत्यंत धोकादायक परिस्थितीमध्ये आहे. पुलाच्या भागावर लोखंडी सळ्या बाहेर आल्या असून, बाजूला मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत, मात्र महामार्ग प्राधिकरण आणि कंत्राटदार यांच्याकडून कोणतेही दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात आलेले नाही.

महामार्ग प्राधिकरणाकडून सिमेंट काँक्रीटचे काम जवळपास पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे, मात्र प्रत्यक्षात अनेक पूल आणि उड्डाणपुलांवर सळ्या धोकादायक अवस्थेत बाहेर आल्या आहेत. करंजविरा पुलासह महालक्ष्मी उड्डाणपूल, घोळ पूल, तसेच अन्य ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे दररोज लहान-मोठे अपघात घडत आहेत.

अवघ्या काही महिन्यांपूर्वी धानिवरीतील सुसरी नदीवरील पुलावरही अशीच अवस्था निर्माण झाली होती. तेथे अनेक महिने दुरुस्तीचे काम चालले. दरम्यान, अनेक अपघात झाले होते. सध्या त्या पुलाची दुरुस्ती पूर्ण झाली असली तरी करंजविरा, महालक्ष्मी आणि घोळ येथील पूल पुन्हा धोकादायक अवस्थेत आले आहेत. वाहनचालकांकडून महामार्ग प्राधिकरणाकडे त्वरित या ठिकाणांवरील खड्डे बुजवण्याची मागणी होत आहे.

सध्या आंबोलीजवळील पुलावर सळ्या बाहेर आल्या असून, खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी साचल्याने वाहन चालवणे अवघड झाले आहे. महामार्ग प्राधिकरणाने त्वरित दखल घेऊन हे खड्डे बुजवावेत. अपघात होण्याआधीच या धोकादायक पुलांवर तातडीने काम हाती घेऊन सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करावी.
- संतोष देशमुख, अध्यक्ष, महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट

करंजविरा नदीवरील पुलाविषयी माहिती मिळाली असून, कंत्राटदारास तातडीने दुरुस्तीचे आदेश देण्यात आले आहेत. वाहनचालकांना त्रास होणार नाही, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- सुहास चिटणीस, व्यवस्थापक, महामार्ग प्राधिकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Ghaiwal: मोठी बातमी! सचिन घायवळला शस्त्र परवाना नाकारला, निर्णयानंतर संपूर्ण कुटुंब फरार

Gautam Gambhir कडून भारतीय संघाला 'डिनर पार्टी'; शुभमन गिल, रवींद्र जडेजासह खेळाडू पोहचले कोचच्या घरी; पाहा Video

Latest Marathi News Live Update : राजद कार्यकर्त्यांची मसौरी येथील राजद आमदार रेखा देवी यांच्या विरोधात निदर्शने

Ladki bahin Yojana : लाडकी बहीण योजना अडकली केवायसीच्या कचाट्यात...

Pune: पठारे विरुद्ध पठारे! मार खाणारा तो सचिन पठारे मी नाही...; पुण्यातील राष्ट्रवादीच्या 'त्या' राड्याला अनोखे वळण

SCROLL FOR NEXT