मुंबई

पाच महिन्यात ५हजार ९७ जाहिरातीवर कारवाई....

CD

शहर विद्रूपीकरणाला चाप
पाच महिन्यांत पाच हजार ९७ जाहिरातींवर कारवाई
तुर्भे, ता. ८ (बातमीदार) : नवी मुंबई शहराच्या प्रवेशद्वारापासून अगदी गल्लीबोळांत बेकायदा जाहिरातींचे पेव फुटले आहे. त्यामुळे सणांच्या आड शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्यांविरोधात मोहीम हाती घेताना पालिका प्रशासनाने पाच महिन्यांत तब्बल पाच हजार ९७ जाहिरातींवर कारवाई केली आहे.
राजकीय नेत्यांच्या जाहिरातींपासून, डझनभर छायाचित्रांसह माहिती देणारे फलक अनेक महत्त्वाच्या मार्गांसह विविध इमारतींभोवती दिसतात. जाहिरात फलक महापालिकेच्या उत्पन्नाचा स्रोत असला, तरी बहुतांशवेळा परवानगीशिवाय फलकबाजी केली जाते. त्यामुळे एकीकडे महसूल बुडत आहे, तर दुसरीकडे शहराचे विद्रूपीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. शहरातील रेल्वे, बस थांबे, महत्त्वाची सर्व ठिकाणांचे बेकायदा जाहिरातींमुळे विद्रूपीकरण होत आहे. महत्त्वाचे म्हणजे, महापालिका फलक लावणाऱ्यांविरोधात वारंवार कारवाई करत आहे, मात्र संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पाठ फिरताच पुन्हा फलक लावले जात असल्याने नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांना कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत.
----------------------------------------------
उच्च न्यायालयाचे निर्देश
- पालिका प्रशासनाने विनापरवानगी जाहिराती लावणाऱ्यांवर कारवाई सुरू केली जात आहे. सुस्वराज्य फाउंडेशन विरोधात महाराष्ट्र शासन बॅनर्स होर्डिंग याविषयीचे याचिकेत उच्च न्यायालयाने अतिशय ‘क’ धोरण स्वीकारले असून, महानगरपालिकेला नियमित कारवाईबाबत सूचित केलेले आहे.
- आठ विभागांत अधिकाऱ्यांना बेकायदा जाहिरातींवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आलेले आहेत. तसेत निर्धारित केलेल्या १२६ जागांवर रीतसर परवानगी देण्यासाठीची प्रक्रिया आयुक्तांच्या निर्देशानुसार सुरू केली आहे.
---------------------------
विभागवार कारवाईची आकडेवारी
विभाग मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर
बेलापूर २२ २९ २२ २२ ६१
नेरूळ : ९५ ९६ १७९ १३८ ८७
वाशी ६५ २४ ५० ४८ ९५
तुर्भे ७० ८० ६८ ७७ १२८
कोपरखैरणे १७८ ३४१ १५० २५६ २६४
घणसोली ३४३ ४५२ ४८३ ३६७ ४४५
ऐरोली ३६ ४० ३७ ३६ १५४
दिघा १७: ६ ० ० ३६
-----------------------------
महिना फलकांची संख्या
मे - ८२६
जून- १,०६८
जुलै- ९८९
ऑगस्ट - ९४४
सप्टेंबर- १,२७०
एकूण - ५,०९७
ः---------------------------------
पालिकेची रीतसर परवानगी घेऊन फलक लावावेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश विभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत. यापुढे अशा कारवाई अधिक तीव्रतेने केल्या जातील.
- डॉ. कैलास गायकवाड, अतिक्रमण उपायुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Ghaiwal: मोठी बातमी! सचिन घायवळला शस्त्र परवाना नाकारला, निर्णयानंतर संपूर्ण कुटुंब फरार

Gautam Gambhir कडून भारतीय संघाला 'डिनर पार्टी'; शुभमन गिल, रवींद्र जडेजासह खेळाडू पोहचले कोचच्या घरी; पाहा Video

Ladki bahin Yojana : लाडकी बहीण योजना अडकली केवायसीच्या कचाट्यात...

Pune: पठारे विरुद्ध पठारे! मार खाणारा तो सचिन पठारे मी नाही...; पुण्यातील राष्ट्रवादीच्या 'त्या' राड्याला अनोखे वळण

AUSW vs PAKW: ७९-७ वरून २२१ धावा! पाकिस्तानने लावलेली वाट, पण ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी-एलना किंग राहिल्या ताठ! वर्ल्ड रेकॉर्डही नावावर

SCROLL FOR NEXT