मुंबई

कर्मचाऱ्यांना मिळाली दसऱ्याची भेट

CD

कर्मचाऱ्यांना मिळाली दसऱ्याची भेट
झेडपी सेवेतील ४४ जणांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : शासकीय सेवेत कार्यरत असताना अकाली निधन झाल्याने त्यांच्या वारसांना अनुकंपातत्त्वावर सेवेत दाखल करून घेत त्यांच्या कुटुंबाला आधार देण्यात येत असतो. त्यानुसार ठाणे जिल्हा परिषद प्रशासनाने त्यांच्या कार्यक्षेत्रातील गट क आणि गट ड संवर्गांतील ४४ जणांना नियुक्तीचे आदेश नुकतेच देण्यात आले. त्यामुळे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या अनुकंपातत्त्वावरील उमेदवारांना आनंद वाटत आहे.
ठाणे जिल्हा परिषदेत कार्यरत असताना अकाली निधन झालेल्या गट क व गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपातत्त्वाखाली सेवेत दाखल करून घेण्यात येत असते. त्यानुसार ठाणे जिल्हा परिषद प्रशासानाकडील प्राप्त झालेल्या अर्जांनुसार त्याची पडताळणी करण्यात येत असते. त्यानंतर त्या वारसांना नोकरीत सामावून घेण्यात येत असते. त्यानुसार ठाणे जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील गट क आणि गट ड संवर्गांतील ४४ जणांना नियुक्ती आदेश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पाचांळ यांच्या हस्ते देण्यात आले. यामध्ये गट ड संवर्गातील ३७ आणि गट क संवर्गातील सात कर्मचाऱ्यांचा समावेश असून, सर्वांनी दिलेल्या कार्यक्षेत्रात हजर राहून शासकीय कार्यभार स्वीकारला आहे. या माध्यमातून दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासकीय सेवेमध्ये संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यमुळे त्यांच्या कुटुंबांना आर्थिक व सामाजिक स्थैर्य मिळणार आहे. या वेळी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी नव्याने रुजू झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करीत त्यांना कार्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि जनसेवेचा भाव ठेवून काम करण्याचे आवाहन केले. तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे यांनी अनुकंपातत्त्वावर करण्यात आलेल्या या नियुक्त्यांमुळे पात्र वारसांना न्याय मिळाला असून, जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना मानवी संसाधनांच्या स्वरूपात बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

fireworks factory blast : फटाक्यांच्या कारखान्यात भीषण आग; सहा जणांचा मृत्यू, चार जखमी!

Maharashtra Government: महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथातून 'गांधीवध' शब्द हटवला; नथुराम गोडसेचा आदरार्थी उल्लेख वगळला

पोलिस आयुक्तांच्या वाहनचालकाचा रेकॉर्ड! दररोज धावतो २१ किलोमीटर, आतापर्यंत जिंकल्या ५५ पेक्षा जास्त मॅरेथॉन; आता ‘सकाळ’तर्फे आयोजित २ नोव्हेंबरच्या मॅरेथॉनमध्येही धावणार

Illegal Hoarding : अनधिकृत फ्लेक्सप्रकरणी २७ गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : रात्री दहानंतर फटाके फोडण्यास बंदी

SCROLL FOR NEXT