मुंबई

सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा

CD

सरन्यायाधीशांवर हल्लाप्रकरणी भीमशक्ती आक्रमक
‘देशद्रोहाचा’ गुन्हा दाखल करण्याची मागणी
कल्याण, ता. ९ (वार्ताहर) : सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा भीमशक्ती संघटना महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे. या हल्लेखोरावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भीमशक्ती संघटनेने केली आहे. भीमशक्ती संघटनेचे संस्थापक खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अपेक्षा दळवी यांच्या शिष्टमंडळाने कल्याणमधील महात्मा फुले चौक पोलिसांना याबाबत निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, सरन्यायाधीशपदावर प्रथमच एक अनुसूचित जातीची व्यक्ती पोहोचल्याने जातीयवाद्यांना हे पचलेले नाही. ॲड. राकेश किशोर या वकिली व्यवसायाला लांछन लावणाऱ्या व्यक्तीची मानसिकता जातीय द्वेषभावना असलेली आहे, असे संघटनेचे म्हणणे आहे. या द्वेषमूलक विचारसरणी आणि अनुसूचित जातीच्या सरन्यायाधीशांशी केलेल्या अशोभनीय गैरवर्तनाबद्दल हल्लेखोरावर देशद्रोह आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध (२०१५ सुधारित अधिनियम) नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी भीमशक्तीने केली आहे. ॲड. अपेक्षा दळवी यांनी या वेळी इशारा दिला की, जर या हल्लेखोरावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही, तर संघटना तीव्र आंदोलन छेडेल.

शिष्टमंडळातील प्रमुख पदाधिकारी
निवेदन देण्यासाठी उपस्थित असलेल्या शिष्टमंडळात चळवळीचे नेते अण्णा रोकडे, बाळ भालेराव, अरुण पठारे, माजी नगरसेवक भीमराव डोळस आणि भीमशक्तीचे पदाधिकारी रमेश साळवे, मंगेश इंगळे, सचिन भोसले, अशोक पगारे, सचिन खरात, आदर्श दळवी, अभिमन्यू गायकवाड, विलास सकपाळ, सुरेश गमरे, सोमा राठोड, आशा सोनवणे, कुमार कांबळे आदींचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Train Accident : पुलाची भिंत तोडून ट्रेनसमोर कोसळला डंपर, अर्ध्या रात्री प्रवाशांचा आरडाओरडा अन् गोंधळ; थरारक अपघाताने सगळेच हादरले

तुम्ही सर्व, गौतम गंभीरला जबाबदार का धरत आहात? सुनील गावस्करांकडून बचाव; आर अश्विन म्हणाला, कोच हातात बॅट घेऊन...

150 वर्षांचं आयुष्य! 100 व्या वर्षीही 25 सारखी तरुणाई; मानवी आयुष्य बदलणारा क्रांतिकारी शोध, शास्त्रज्ञांचा नवा फॉर्म्युला काय?

Latest Marathi News Live Update : इंडिगो पुन्हा लेट; तिकीट विमानाचे, मात्र चारचाकीने मुंबई गाठण्याची वेळ

'ठरलं तर मग' च्या सेटवर नक्की काय घडतं? सायलीने दाखवली झलक, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणतात...'मालिकेत पुढे मोठा ट्विस्ट...'

SCROLL FOR NEXT