मुंबई

स्वच्छ शहरासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा: उपायुक्त रामदास कोकरे

CD

स्वच्छ शहरासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा : उपायुक्त रामदास कोकरे
कल्याण, ता. ९ (वार्ताहर): स्वच्छ व सुंदर कल्याण-डोंबिवली शहरासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन कल्याण-डोंबिवली महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी केले. ड प्रभाग परिसरात स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे आणि कचरा व्यवस्थापनात नागरिकांचा सहभाग वाढवणे, या उद्देशाने सहाय्यक आयुक्त उमेश यमगर यांनी आयोजित केलेल्या बैठकीत ते मार्गदर्शन करत होते ही बैठक ड प्रभागातील खडेगोळवली परिसर व पूना लिंक रोड परिसर येथील स्वच्छता तसेच मालमत्ता कर जनजागृती या उद्देशाने आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या.

पूना लिंक रस्ता, पंचमुखी हनुमान मंदिर परिसर आणि रखमाबाई नगर परिसरातील बॅग कारखानदारांनी रात्री १० ते १२ या वेळेत त्यांच्याकडील स्क्रॅप मटेरिअल महानगरपालिकेच्या आर.सी. गाडीत नियमितपणे जमा करावे. स्थानिक बॅग उत्पादक व नागरिकांनी घरगुती कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण करूनच महापालिकेच्या कचरागाडीत द्यावा. सर्व फेरीवाले, भाजीवाले, फळविक्रेते व गॅरेजधारक यांनी त्यांच्या व्यवसाय स्थळाची स्वच्छता दिवसभर राखावी.
स्वच्छतेची सवय घरापासून सुरू होऊन परिसरापर्यंत पोहोचली पाहिजे, यावर भर देण्यात आला. या बैठकीला उपआयुक्त रामदास कोकरे, सहा. आयुक्त उमेश यमगर, माजी पालिका सदस्य विकी तरे, स्वच्छता अधिकारी विक्रम गायकवाड तसेच बॅग कारखानदार संघाचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. बैठकीतील उपस्थितांनी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सक्रिय सहभाग देण्याचे आश्वासन दिले.

दंडात्मक कारवाईचा इशारा
उपायुक्त रामदास कोकरे यांनी खडेगोळवली परिसरात कचरा संकलनाची प्रत्यक्ष पाहणी केली असता, काही नागरिक कचऱ्याचे वर्गीकरण न करता एकत्रित देत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी या वेळी स्पष्ट निर्देश दिले की, सर्व नागरिकांनी ओला व सुका कचरा वर्गीकरण करूनच महापालिकेच्या गाडीत द्यावा, अन्यथा नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur politics : मतदार यादीतील गोंधळ, सुनावणी पुढे ढकलली… महापालिका निवडणुकीवर अनिश्चिततेचे ढग; इच्छुकांमध्ये चिंता वाढली

Latest Marathi News Live Update: MH60R हेलिकॉप्टरच्या ताफ्याला फॉलो-ऑन सपोर्ट आणि फॉलो-ऑन सप्लाय सपोर्टद्वारे शाश्वत पाठिंबा

Mumbai News: वाय-फाय, चार्जिंग, कॅफे, सोफा… मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर विमानतळासारखे डिजिटल लाउंज उभारणार, कधी सुरू होणार?

Kolhapur Politics : दिवसा नियोजन, रात्री जोडण्या; चंदगडच्या गल्लीगल्लीत निवडणूक तापवणारी गुप्त राजकीय व्यूहरचना!

SMAT 2025: T20 सामन्यात सुपर ओव्हरचा ड्रामा! अभिषेक शर्मा गोल्डन डकवर बाद, CSK च्या गोलंदाजांनं दोनदा धाडलं माघारी

SCROLL FOR NEXT