मुंबई

विरारमध्ये पक्ष्यांची शाळा भरणार

CD

विरार, ता. ११ (बातमीदार) ः वसई-विरारचा परिसर हा निसर्गरम्य आहे. याठिकाणी लाभलेली विस्तीर्ण किनारपट्टी, त्याचबरोबर ग्रामीण भागातील हिरवाईमुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पक्षी येतात. आता वसई-विरार महापालिकेकडून लवकरच विरारच्या नारिंगी परिसरात पक्षी उद्यान उभारले जाणार आहे. यानिमित्ताने शहरवासीयांना विविध प्रजातींचे पक्षी पाहता येणार आहेत. यासाठीची निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाणार आहे. या उद्यानात दुर्मिळ पक्ष्यांसह विविध प्रजातीचे पक्षी ठेवण्यात येणार असून या कामासाठी ११६ कोटी खर्च अंदाजित आहे.

यापूर्वीच्या आयुक्तांनी पालिका हद्दीत सर्प उद्यान, म्युझिकल गार्डन, हरिण पार्क, बॉटनिकल गार्डन उभारण्याच्या घोषणा केल्या होत्या; पण त्या कागदावरच राहिल्या आहेत. आता आयुक्तांनी पक्षी उद्यानाची घोषणा केले आहे. पालिका विरार पश्चिमेच्या नारिंगी येथील परिसरात सर्व सुविधांयुक्त असे पक्षी उद्यान उभारले जाणार आहे. यासाठी पालिका प्रशासनाने आता हालचाली सुरू केल्या असून लवकरच यासाठी निविदा पूर्ण केली जाणार आहे. एकूण साडेसोळा हेक्टर जमिनीवर पक्षी उद्यान उभारले जाणार आहे, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली. यासाठी पालिकेच्या मालकीच्या नारिंगी येथील जागेचा वापर करण्यात येणार आहे. यात विविध प्रजातींसह काही दुर्मिळ पक्ष्यांचा समावेश असणार आहे. यामुळे शहरातील नागरिकांना विविध पक्ष्यांचे दर्शन एकाच ठिकाणी होणार आहे.

पक्षी उद्यानात पक्ष्यांसाठी नैसर्गिक निवाऱ्यांची सोय करणे, तसेच त्यांना मुक्तपणे विहार करता येईल, अशी रचना करण्यावर पालिकेचा भर असणार आहे. या निमित्ताने शहराला पहिलेच पक्षी उद्यान लाभणार आहे. याआधी तत्कालीन विरार नगर परिषदेच्या काळात विरार पूर्वच्या तोटाळे तलाव परिसरात छोटेखानी पक्षी उद्यान उभारण्यात आले होते. यानंतर आता बऱ्याच वर्षांनंतर शहरात पक्षी उद्यान उभारण्यात येणार आहे. यानिमित्ताने शहरातील पर्यटनालाही चालना मिळणार आहे, असे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

शहराचा विकास करताना नागरिकांना विरंगुळ्यासाठी जागा तयार करणे, तसेच पर्यावरण दृष्टिकोनातून पर्यटन कसे वाढेल, याचा विचारही पालिका करत आहे. पक्षी उद्यानाच्या माध्यमातून हे शक्य होणार आहे. यासाठीचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पाठविला जाणार आहे.
- मनोजकुमार सूर्यवंशी, आयुक्त, वसई-विरार महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: महापरिनिर्वाण दिनासाठी रेल्वेची मोठी तयारी! ४ ते ८ डिसेंबरदरम्यान विशेष गाड्या धावणार, जाणून घ्या वेळापत्रक...

Hinjewadi IT Park bus accident : पुण्यातील हिंजवडी IT पार्कमध्ये भीषण अपघात; भरधाव बस फूटपाथवर चढली अन् दोन भावंडाना चिरडलं!

Mumbai News: नवी मुंबईकरांनो लक्ष द्या!सीवूड्स-दारावे स्थानकाचे नाव बदलले; रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय, कारण काय?

नवऱ्या-नवरीची बुलेटवरून एंट्री अन् सुनेला हळद लावणाऱ्या कूल सासूबाईं; पाहा बांदेकरांच्या हळदीचे Inside Photos

Pune Crime : नशेच्या गोळ्यांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; शहरात मोठ्या प्रमाणावर विक्री; सात हजार नशेच्या गोळ्या जप्त!

SCROLL FOR NEXT