कल्याण पूर्वेत सोनोग्राफी सुविधा सुरू करा
कल्याण, ता. ९ (बातमीदार) ः कल्याण शहराच्या पूर्व भागातील आरोग्य सुविधांची कमतरता दूर करण्यासाठी माजी नगरसेवक उदय रसाळ यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी सीएसआर फंडाद्वारे मोफत एक्स-रे, एमआरआय, सोनोग्राफी आणि रक्त तपासणी सुविधा सुरू करण्याची मागणी केली आहे. या महत्त्वपूर्ण प्रस्तावाबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे रसाळ यांनी सांगितले. रसाळ यांनी महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ला यांच्यासोबत चर्चा करून ही मागणी केली.
कल्याण पूर्व भागात गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांची संख्या मोठी आहे. हे नागरिक करदाते असूनही, खासगी रुग्णालयांमधील उपचार खर्च परवडत नसल्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागतो. बजेटमधील मर्यादा लक्षात घेऊन, रसाळ यांनी कल्याण-डोंबिवलीतील मोठ्या उद्योग कंपन्यांच्या सीएसआर निधीचा वापर करून हा उपक्रम राबवण्याची सूचना केली. रसाळ यांनी स्पष्ट केले, की हा केवळ आरोग्य सुविधा प्रकल्प नसून, लाखो कुटुंबांच्या जीवनमानाशी निगडित प्रश्न आहे. ही योजना इतर प्रभागांसाठी आदर्श ठरू शकते. ही मोफत सुविधा गीता हरकिसनदास महापालिका रुग्णालय किंवा एका नव्या आरोग्य केंद्रात सुरू करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. रहिवाशांना दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्यसेवेचा लाभ मिळवून देण्यासाठी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी लवकरात लवकर पावले उचलावीत, अशी मागणी रसाळ यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.