नालासोपाऱ्यात मनोत्सव २०२५
१० ते १८ ऑक्टोबरदरम्यान मानसिक आरोग्याचा उत्सव
विरार, ता. ९ (बातमीदार) ः वसई-विरार इन्स्टिट्यूट ऑफ बिहेवियरल हेल्थ अँड सायन्सेस विभास मनोविकार हॉस्पिटल तर्फे “मनोत्सव २०२५” हा मानसिक आरोग्याचा आठवडाभराचा सोहळा १० ते १८ ऑक्टोबर २०२५ दरम्यान आयोजित केला आहे. हा उपक्रम “वर्ल्ड मेंटल हेल्थ डे” निमित्ताने आयोजित करण्यात आला असून, विविध शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांमध्ये मानसिक आरोग्य जागरूकतेसाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन आणि पहिला दिवस नालासोपारा मेडिकल असोसिशनच्या सहभागासह रिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथील शिवराजजी गोयल सभागृहात शुक्रवार, (ता.१०) सकाळी १० वाजता साजरा होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यास वैद्यकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना आणि दीपप्रज्वलनाने होईल. त्यानंतर मनोविकारतज्ज्ञ डॉ. सुरेश पाटील ‘स्ट्रेस मॅनेजमेंट’ या विषयावर प्रेरणादायी मार्गदर्शन करतील.
डॉ. किर्ती तांडेल या सत्रात मानसोपचारातील गैरसमज दूर करण्यावर भर देतील. रिद्धिविनायक नर्सिंग कॉलेज, उदय गिर नर्सिंग कॉलेज आणि भक्तिवेदांत हॉस्पिटल मिरा रोड येथील विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम आणि नाटिकेद्वारे मानसिक आरोग्याचा सुंदर संदेश देतील. याप्रसंगी पालघर जिल्ह्यातील मानसिक आरोग्य चळवळीत उल्लेखनीय सामाजिक योगदान देणाऱ्या १० व्यक्तींना “मनोवीर पुरस्कार २०२५”ने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्काराचा उद्देश समाजात मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणाऱ्या आणि मानसिक आजारांविषयी असलेले कलंक दूर करण्यासाठी कार्यरत असलेल्या व्यक्तींना गौरविणे हा आहे. “मनोत्सव २०२५”चा हेतू म्हणजे समाजातील प्रत्येक स्तरावर मानसिक आरोग्याविषयी संवेदनशीलता वाढवणे, तणाव, नैराश्य, व्यसन आणि आत्महत्येच्या समस्यांवर मुक्तपणे संवाद साधणे आणि सकारात्मक मानसिकतेचा संदेश पसरवणे हा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.