टीजेएसबी बँकेची ऐतिहासिक कामगिरी
ग्राहकांना कार्डविना रोख रक्कम काढण्याची आणि भरण्याची सुविधा
ठाणे, ता. ९ (बातमीदार) : टीजेएसबी सहकारी बँकेने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. यूपीआय-आयसीडी अधिग्रहणकर्ता म्हणून लाइव्ह होणारी भारतातील पहिली बँक म्हणून टीजेएसबीची नोंद झाली आहे. यामध्ये एनपीसीआयद्वारे विकसित यूपीआय-आयसीडी फ्रेमवर्क अंतर्गत ग्राहकांना साध्या यूपीआय क्यूआर कोडद्वारे कोणत्याही सहभागी बँकेच्या मशीनवरून रोख रक्कम जमा किंवा काढण्याची सुविधा मिळणार आहे.
बँकेचे अध्यक्ष शरद गांगल म्हणाले, भारताचे पहिले यूपीआय-आयसीडी अधिग्रहणकर्ता होणे हे जगाच्या पुढे राहण्याची आणि नेक्स्ट-जेन डिजिटल पर्याय उपलब्ध करून देण्याची बांधिलकी अधोरेखित करते. हा संपूर्ण टीजेएसबी परिवारासाठी अभिमानाचा क्षण आहे. व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल आरेकर म्हणाले, हे यश बँकेच्या तांत्रिक प्रगती आणि ग्राहक-केंद्रिततेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित आहे. १९७२ मध्ये स्थापन झालेली टीजेएसबी बँक ही महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेशातील १५९ शाखांद्वारे कार्यरत आहे.
यूपीआयवर आधारित कॅश मशीन
टीजेएसबी बँकेचे अँड्रॉइड कॅश रीसायकलर मशीन ७ ते ९ ऑक्टोबरदरम्यान मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे होत असलेल्या ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२५ मध्ये एनपीसीआयच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आले. हे मशीन यूपीआय एटीएम आणि यूपीआय इंटरऑपरेबल कॅश डिपॉझिटर म्हणून काम करते. यामुळे सहभागी कोणत्याही बँकेचा ग्राहक टीजेएसबीच्या मशीनवर यूपीआय ॲपद्वारे क्यूआर स्कॅन करून रोख रक्कम जमा किंवा काढू शकेल. या व्यवहारांसाठी डेबिट कार्ड किंवा बँक-विशिष्ट प्रमाणीकरणाची गरज भासणार नाही. त्यामुळे रोख व्यवहार अधिक सुरक्षित, सोपे आणि इंटरऑपरेबल ठरणार आहेत. हे बँकिंग क्षेत्रातील तांत्रिक क्रांतीचा मोठा टप्पा मानला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.