मुंबई

जुन्या वादातून जीवघेणा हल्ला

CD

जुन्या वादातून जीवघेणा हल्ला
एपीएमसी पोलिसांची पाच जणांवर कारवाई
नवी मुंबई, ता. ९ (वार्ताहर) ः वाद मिटवण्याच्या बहाण्याने पाच ते सात हल्लेखोरांनी क्रिकेट बॅट, फायबर रॉडने तिघांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना तुर्भेमध्ये मंगळवारी (ता. ७) मध्यरात्री घडली. या प्रकरणात एपीएमसी पोलिसांनी पाच जणांना अटक केली.
तुर्भे सेक्टर २१ मध्ये राहणारे आशुतोष धुर्वे याची विक्रम ऊर्फ विकी पाटीलशी काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. हा वाद मिटवण्याच्या बहाण्याने विकी पाटीलने आशुतोषला मंगळवारी मध्यरात्री तुर्भे सेक्टर २१ येथील बोलावून घेतले होते. या वेळी आशुतोषसोबत किशोर वरक, विकी कांबळेदेखील उपस्थित होते. या वेळी विकी पाटील, त्याची पत्नी चारुशिला, त्याचे मित्र संकेत तुकाराम लाड ऊर्फ लाडू, ओंकार वाघमारे ऊर्फ गण्या, वेदांत ऊर्फ विश्वेश घरत, झकील नबीलाल शेख, मौलाली ऊर्फ मौला नबीलाल शबन भंडर यांनी क्रिकेटची बॅट, फायबर रॉडने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात किशोर वरक हा गंभीर जखमी आहे, तर आशुतोषच्या डाव्या हाताला तर विकी कांबळेच्या बरगडी, हाताला दुखापत झाली आहे. या घटनेत एपीएमसी पोलिसांनी विकी पाटील, संकेत लाड, विश्वेश घरत, झकील शेख आणि मौला भंडरला अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: ''एक व्यक्ती आपल्यात नाही, याची उणीव भासतेय..'' भरसभेत धनंजय मुंडेंनी काढली वाल्मिक कराडची आठवण?

Kolhapur Election : नेत्यांची विरोधकांशी घसट, कार्यकर्त्यांची फरपट; पाच नगरपालिकांत भाजपचे ‘कमळ’ गायब, मुख्यमंत्र्यांवर कार्यकर्ते नाराज

फक्त तू आणि मी कुठेतरी जायचं का? ज्वेलर्सच्या उद्धघाटनाला गेलेल्या मराठी अभिनेत्रीला मालकाचा थेट प्रश्न; म्हणाली, 'दुसऱ्या अभिनेत्रींमुळे आम्हालाही...'

धर्मेंद्र यांचा अखेरचा आवाज…! इकडे 'इक्कीस' सिनेमातील धर्मेंद्र यांची वॉईस नोट व्हायरल, दुसरीकडे पंचतत्वात विलीन झाले ही मॅन

Karnataka Politics : मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेला पुन्हा उधाण! DK शिवकुमारांनी दिला थेट इशारा; म्हणाले, 'घर फोडण्याचं काम..'

SCROLL FOR NEXT