मुंबई

शरीराचा एकही भाग न दाखवता सादर केलेली कला म्हणजे लावणी - खा. म्हस्के

CD

लावणी हा शृंगाराचा आत्मा : म्हस्के
नाद मराठी लावणीच्या कार्यक्रमात प्रतिपादन
ठाणे शहर, ता. १२ : लावणी हा शृंगाराचा आत्मा आहे. महाराष्ट्र या लावणीवरील प्रेम कधीच कमी होऊ देणार नाही, अशा शब्दांत खासदार नरेश म्हस्के यांनी कौतुक केले. काशिनाथ घाणेकर येथे आयोजित केलेल्या ‘नाद मराठी लावणीचा’ या कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. द अन्नी फाउंडेशन आणि हॉटेल लेरिडा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जमा झालेला निधी महिला आणि पुरुषांच्या व्यसनमुक्तीकरिता वापरला जाणार आहे.
द अन्नी फाउंडेशन ही संस्था मानसिक रुग्ण आणि व्यसनाचा आहारी गेलेल्या महिला पुरुषांसाठी काम करते. त्यांचे पुनर्वसन करून त्यांना मुख्य प्रवाहात आणले जाते. या कामाला आर्थिक हातभार लागावा, याकरिता फाउंडेशनने ‘नाद मराठी लावणीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शुक्रवार (ता. १०) डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडला. त्या वेळी खासदार नरेश म्हस्के प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी त्यांनी लावणी कलेचे तोंडभरून कौतुक केले. त्यांनी लावणीला महाराष्ट्राची लोकप्रबोधन कला म्हटले. या कलेतून लोकप्रबोधन केले जाते. त्यामुळे या कलेवरील महाराष्ट्राचे प्रेम कधीच कमी होऊ शकणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लावणी हा सगळ्या नृतकलेचा परिपाक आहे. भरत नाट्य, कथ्थक, कुचिकुडी अशा सगळ्या कला या नृत्यकलेत दिसतील, असेही शेवटी म्हस्के म्हणाले.
‘नाद मराठी लावणीचा’चे दिग्दर्शक बालगंधर्व विजेते आशिमिक कामठे यांनी सादर केलेल्या लावणीला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या प्रसंगी द अन्नी फाउंडेशनच्या आरती पितळे, वकील नवनीत भोजने, हॉटेलच्या संचालिका संगीता सकपाळ, रोटरीचे डॉक्टर नीलेश जयवंत, लक्ष्मी सिंग, अशोक भराबदे, पूजा देसाई आदीसह अनेक मान्यवर आणि प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतीय कसोटी संघात Ruturaj Gaikwadला मोठी जबाबदारी; गटांगळ्या खाणारा संघ मजबूत होणार, जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स

'मिर्झा एक्सप्रेस' काळाच्या पडद्याआड; हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचं निधन; अमरावतीत होणार अंत्यसंस्कार...

Latest Marathi News Live Update : अंबरनाथ जाहीर सभेत शिंदे भाजपवर हल्लाबोल, प्रवक्त्या ज्योती वाघमारेंची टीका

Kolhapur Marriage Pressure : लग्नासाठी मुली मिळेनात म्हणून आलं नैराश्य, मनातून खचला अन् तरुणाने थेट नदीत घेतली उडी...

अयोध्या ठरली युपीचे 'ग्रोथ इंजिन': योगी सरकारच्या धोरणांमुळे पर्यटन आणि व्यवसायात जबरदस्त वाढ

SCROLL FOR NEXT