मुंबई

दिवाळी खरेदीसाठी क्रॉफर्ड मार्केटमध्ये गर्दी

CD

दिवाळी खरेदीसाठी क्रॉफर्ड मार्केटमध्ये गर्दी
कुलाबा, ता. १४ ः क्रॉफर्ड मार्केटमध्ये दिवाळी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी उसळली आहे. गृहसजावटीसाठी आणि शोभेच्या वस्तूंचे अनेक पर्याय या बाजारात उपलब्ध आहेत. होलसेल दराने साहित्य मिळत असल्यामुळे मुंबईकरांचा खरेदीसाठीची पहिली पसंत कायम क्रॉफर्ड मार्केटला राहिली आहे. महत्त्वाचे म्‍हणजे, अगदी राजस्थान, गुजरातमधून व्यापारी येथे होलसेल खरेदीसाठी येतात.
दिवाळीचा सण तोंडावर येताच दक्षिण मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमधील सर्वच रस्ते गर्दीने फूलू लागले आहेत. रंगीबेरंगी ​विजेच्या माळा, विविध रंग व डिझाइनच्या लाइटिंग, एलईडी दिवे, लोंबकळणाऱ्या माळा, ​पणत्या आणि दिवे, मातीच्या पारंपरिक पणत्या, डिझायनर पणत्या, पाण्यावर चालणारे दिवे, कंदील आणि मेणबत्त्या, ​तोरण, दरवाजावर लावण्यासाठी फुलांचे, मोत्यांचे आणि कापडी तोरण या बाजारात अगदी स्वस्त दरात मिळतात. याशिवाय आकाशकंदील, रांगोळीचे साहित्य, साचे नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत.
स्वस्त दरातील ड्रायफ्रूट्सचे पॅक, चॉकलेट्स, लहान मुलांसाठी खेळणी आणि इतर वस्तू गिफ्टच्या स्वरूपात मिळतात. लोहार चाळ आणि मंगलदास मार्केटच्या आसपासचा परिसर सजावटीच्या वस्तूंसाठी विशेष प्रसिद्ध आहे. खरेदी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांमुळे या ठिकाणी वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी होते. जे. जे. उड्डाणपूल, पोलिस मुख्यालयाचा परिसर लोकमान्य टिळक मार्ग व लोहार चाळ येथील मुख्य रस्ता येथे वाहतूक कोंडी होत आहे.

दरवर्षीप्रमाणे या वेळीदेखील दिवाळी खरेदीसाठी मार्केटमध्ये आलो आहे. रंगीबेरंगी एलईडी लाइट्स घेऊन जात आहे. आम्ही चिनी वस्तूंवर बहिष्कार घातला आहे.
- संतोष घरत, मुंबईकर

या ठिकाणी साहित्य खरेदीचे अनेक स्वस्त पर्याय उपलब्ध आहेत, मात्र मार्केटमध्ये गर्दी आहे, त्यामुळे आपल्या किमती वस्तूंची देखभाल स्वतःच करावी लागते.
- रवींद्र जैन, ग्राहक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: देशाच्या पहिल्या डॉनची मुलगी त्रस्त; मोदी आणि शहांकडे न्यायाची मागणी, काय घडलं? पाहा भावनिक व्हिडिओ व्हायरल

PMC Election : पुणे महापालिका निवडणुकीसाठी ३९४६ मतदान केंद्रांची तयारी; प्रत्येक ९०० मतदारांसाठी एक केंद्र

Silver Price Today : अरे बापरे! चांदीचा भाव 2 लाखांवर; वर्षात दिला तब्बल 121% रिटर्न! भाव आजून वाढणार का?

INDU19 vs UAEU19 : भारताचा २३४ धावांनी दणदणीत विजय, वैभव सूर्यवंशीच्या विक्रमी १७१ धावा; आता पाकिस्तानला रविवारी भिडणार

Mumbai Police: पोलिसांसाठी सुखद वार्ता! ५३८ चौरस फूट सरकारी घरे मंजूर; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, कुणाला फायदा होणार?

SCROLL FOR NEXT