मुंबई

ठाण्यात महायुती विस्कळीत

CD

ठाण्यात महायुती विस्कळित
तीन पक्षांची तोंडे तीन दिशांना
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ ः आगामी महापालिका निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला रोखण्यासाठी महाविकास आघाडीची मोट घट्ट बांधण्याचा प्रयत्न होत आहे. याची झलक सोमवारी (ता. १३) निघालेल्या मोर्चात पाहायला मिळाली. असे असताना दुसरीकडे राज्यात महायुती असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये महापौर पदावरून जुंपली आहे. या वादामध्ये आता राष्ट्रवादी अजित पवार गटानेही उडी मारली असून, या शर्यतीचा किंगमेकर आपणच ठरणार असल्याचा दावा केला आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील वाद वाढत असल्याने महायुती विस्कळित होत असल्याचे दिसत आहे.
ठाणे महापालिका निवडणूक २०२६च्या पहिल्या सहा महिन्यांत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यादृष्टीने प्रभागरचनेची प्रक्रिया पार पडली. आता पुढील प्रशासकीय सोपस्कार होतील. पण त्याआधीच ठाण्यात राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार असले तरी ठाण्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधून विस्तव जात नसल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत पडलेली ठिणगी विधानसभा निवडणुकीत काहीशी थंडावली. पण त्यानंतर ठाणे शहरासह जिल्ह्यामध्ये या दोन्ही पक्षांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व कमी करण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांना बळ मिळत असल्याची चर्चा आहे.
वनमंत्री गणेश नाईक आणि खासदार नरेश म्हस्के यांचे खटके उडत असून, भाषेचा दर्जा दिवसेंदिवस खालावत आहे. वास्तविक ठाणे महापालिकेत शिवसेना शिंदे गटाची ताकद असून, सर्वाधिक माजी नगरसेवक त्यांच्याकडे आहेत. भाजपही आता दुसऱ्या क्रमांकावर आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटही आपले बळ वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. हे तिन्ही पक्ष महायुती म्हणून ठाण्यात एकत्र कुठेच दिसत नाहीत. उलट शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस हे विरोधक म्हणून आपली भूमिका एकत्रितपणे चोख बजावताना दिसत आहेत. ठाकरे बंधूंच्या युतीवर शिक्कामोर्तब झाले नसतानाही महाविकास आघाडीला ठाण्यात मनसेचे बळ मिळाले आहे. त्यामुळे विरोधकांची मोट अधिक घट्ट झाली आहे.

रस्सीखेच अटळ
सोमवारी निघालेल्या शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या मोर्चामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसने सहभाग घेत हे दाखवून दिले. ठाणे महापालिकेतील कथित भ्रष्टाचार असो वा नागरी समस्या असतील विरोधक एकवटले असून, आगामी महापालिका निवडणुकीत हलक्यात घेऊ नका, असा एकप्रकारे इशारा दिला आहे. पण याचे गांभीर्य सत्ताधाऱ्यांनी समजून घेतलेले नाही. या सर्व गदारोळातही महापौर कोणत्या पक्षाचा असेल, यावर वाद निर्माण केला जात आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये यावरून रस्सीखेच आगामी काळात पाहायला मिळणार आहे. या भांडणापासून राष्ट्रवादी अजित पवार गट सध्यातरी फारकत घेऊन आहे. किंबहुना त्यांना कुणी विचारात घेत नाही. असे असले तरी निवडणुकीनंतर आपणच किंगमेकर ठरणार, असा विश्वास राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून व्यक्त केला जात आहे.

विरोधकांपुढेही आव्हान
शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन विचारे, मनसेचे अविनाश जाधव आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची धुरा हाती घेतली आहे. काँग्रेसच्या विक्रांत चव्हाण यांचीही त्याला साथ मिळत असून, वातावरण तापवण्यास सुरुवात केली आहे. त्याला आता यशही मिळू लागले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट सोडला तर शहरात आणि जिल्ह्यात उर्वरित तिन्ही पक्षांकडे लोकप्रतिनिधी नाहीत. माजी नगरसेवकांची संख्या नाही. पदाधिकारी आणि कार्यकत्यांची गळती लागली आहे. ही गळती थांबवण्याचे मोठे आव्हान विरोधकांसमोर असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेटला वेस्ट इंडिजची नव्हे, जगाला त्यांची गरज...; गौतम गंभीर स्ट्रेट टू हार्ट, पाहुण्यांच्या ड्रेसिंग रूममधील Video

Bomb Threat: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी; तमिळनाडू कनेक्शन?

Maharashtra Politics : विजय वडेट्टीवारांचा आरोप; सत्ताधारी महायुती निवडणुका पुढे ढकलण्याच्या प्रयत्नात; अजित पवारांच्या पक्षाची धर्मनिरपेक्षता खोटी

३ मुले आई-वडिलाविना पोरकी! पत्नीच्या चारित्र्यावर संशय; शेवटचे समजावून सांगायला गेला अन्‌ चाकूने भोसकून केला पत्नीचा खून

ओळख लपूवन सोलापूरपासून 900KM अंतरावर राहिले पती-पत्नी! भीशीतून 131 जणांना 2.69 कोटींचा गंडा; आंध्रप्रदेशात १५ महिन्यांपासून चालवत होते भजी स्टॉल

SCROLL FOR NEXT