मुंबई

उद्यानात मिळणार वाहतूक नियमांचे धडे

CD

भाईंदर, ता. १५ (बातमीदार) : रस्त्यांवर सातत्याने वाढत असलेल्या वाहनांच्या गर्दीमुळे वाहतुकीचे नियम पाळणे अत्यावश्यक झाले आहे, मात्र त्यासाठी नियम काय आहेत, याची माहिती असणे गरजेचे आहे. थोरा-मोठ्यांसह लहान मुलांना खेळता-खेळता या नियमांची माहिती व्हावी, यासाठी मिरा-भाईंदर महापालिकेने ‘ट्रॅफिक पार्क’ची निर्मिती केली आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते नुकतेच त्याचे लोकार्पण करण्यात आले.

मिरा रोड येथील कनाकीया भागात आरक्षण क्र. २५६ यावर ‘ट्रॅफिक पार्क’ निर्माण करण्यात आले आहे. त्याचे एकूण क्षेत्रफळ दोन हजार ३६५ चौरस मीटर आहे. या उद्यानात वाहतुकीच्या नियमांसदर्भातील विविध सांकेतिक चिन्हे लावण्यात आली आहेत. त्यासोबतच त्याची माहितीदेखील देण्यात आली आहे. रस्त्यावरील सिग्नल कसे काम करतात, झेब्रा क्रॉसिंगसह मारलेले विविध पट्टे, तसेच बाणांचा अर्थ काय असतो, मार्गिका कशा दाखवल्या जातात, रस्त्याच्या बाजूला लावलेल्या फलकांवर असलेली गतिरोधक, प्रवेशबंदी, एकदिशा मार्ग, वळण, आदींची चिन्हे कशी ओळखायची, त्याचप्रमाणे उड्डाणपूल, रुग्णालय यांचे फलक कशासाठी लावले जातात, अशी माहिती याठिकाणी देण्यात आली आहे. मुलांना खेळता-खेळता या चिन्हांची माहिती सहजरीत्या व्हावी, हा यामागचा उद्देश आहे. या ट्रॅफिक पार्कला ‘स्व. गिल्बर्ट जॉन मेंडोन्सा ट्रॅफिक पार्क’ असे नाव देण्यात आले आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून हा उद्यानाची निर्मिती करण्यात आली असून, राज्य सरकरने पाच कोटींचा निधी त्यासाठी दिला आहे.

वाहतूक शिस्त ही सुरक्षित समाजाची पायरी आहे. लहान मुलांना बालपणापासूनच वाहतूक नियमांचे शिक्षण देणे गरजेचे आहे. या ‘ट्रॅफिक पार्क’द्वारे हे कार्य प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.

सुरक्षित वाहतुकीची संस्कृतीसाठी प्रेरणादायी
नागरिकांमध्ये विशेषतः लहान मुलांमध्ये वाहतूक नियमांचे शिक्षण, जनजागृती आणि सुरक्षित वाहतुकीची संस्कृती निर्माण व्हावी, हा या उद्यानामागचा उद्देश आहे. उद्यानात वाहतुकीच्या नियमांच्या माहितीसह लहान मुलांना खेळण्यासाठी स्वतंत्र जागा, कमांडो वॉल, क्लायबिंग वॉल, स्विमिंग ब्रिज, वेगवेगळे टनेलदेखील उभारण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss 19 Winner: गौरव खन्ना ठरला बिग बॉस 19 चा विजेता, फरहाना भट्ट ठरली रनरअप

Mumbai: बीएमसीच्या प्रारूप मतदार यादीत मोठे बदल; चार वॉर्डमध्ये ५०% पेक्षा जास्त वाढ, तर २४ वॉर्डमध्ये घट

Khandala : सातारा-पुणे मार्गावर भरधाव ट्रकची अनेक वाहनांना धडक, ट्रकचालक फरार

रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक फिस्कटले! हुतात्मा, वंदे भारत एक्स्प्रेस सोलापूरला वेळेत, पण दक्षिणेकडे जाणाऱ्या ‘या’ गाड्या २ ते ३ तासांनी धावताहेत उशिराने

Nanded Drug Seizure : शिवणीत तुरीच्या ताशेत लपवलेला ‘गांजा’ उघड; पोलिसांची धाड, ₹1.60 लाखांचा मुद्देमाल जप्त!

SCROLL FOR NEXT