मुंबई

बहिरीनाथ आज भक्तांच्या भेटीला

CD

बहिरीनाथ आज भक्तांच्या भेटीला
दिवाळे गावातील पालखी सोहळा मुख्य आकर्षण
तुर्भे, ता. १९ (बातमीदार): बेलापूर पट्टीतील दिवाळेकरांचे श्रद्धास्थान असलेल्या बहिरीनाथ देवाचे सोमवारी आगमन होणार आहे. वर्षभर समुद्रात राहणारा देव येत दिवाळी सणानिमित्त भक्तांना भेटण्यासाठी असल्याने कोळीवाड्यात दिवाळीसोबतच उत्साहाचे वातावरण संचारले आहे.
घारापुरी बेटाजवळील समुद्रातून बहिरीदेवाची मूर्ती होडीने दिवाळे कोळीवाड्यात आणली जाते. त्यानंतर गावची दिवाळी उत्सवाला सुरूवात होते. २५० वर्षांहून जुनी प्रथा असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी गावातील ३०० हून अधिक तरुण ३५ ते ४० होड्या घेऊन बहिरीनाथ देवाला गावात आणायला घारापुरी बेटाजवळील खोल समुद्रात जातात. यावेळी, समुद्रात बुडी मारून गावातील तांडेल कुटुंबातील पुरुष समुद्राखालून देवाची मूर्ती शोधून काढून होडीत आणतात. तांडेल कुटुंबातील पुरुषांनाच ही मूर्ती सापडते, अशी आख्यायिका आहे. यावेळी देवघरात देवाच्या गाभाऱ्यांसह पालखीला रंगरंगोटी करून हार फुलांनी सजावण्यात आली आहे.
--------------------
तीन दिवस कार्यक्रमांची रेलचेल
- बहिरीनाथ देवाचा तीन दिवस चालणारा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या उत्सवात देवाच्या दर्शनाला; तसेच नवस बोलण्यासाठी नवी मुंबई, मुंबई, पनवेल, ठाणे येथून हजारो भाविकांची गर्दी होते. देवाला अंघोळ घालून शेंदूरलेपन करून पालखीत बसवून पारंपरिक वाद्याचा जयघोष करत मूर्ती देवळात आणली जाते.
- रात्री भजन-कीर्तनात, पारंपरिक कोळीगीतांनी देवाची आळवणी करण्यात येते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवाला सकाळी अभिषेक घालून सायंकाळी पालखीत बसवून मोठ्या धामधुमीत ग्रामप्रदक्षिणा करण्यात येते. या वेळी गावातील भाविकांनी देवाला दिवाळीचा फराळ, मिठाई, नारळ, हार, फुले अर्पण केली. रात्री देवाला मंदिरात बसवून रात्रभर जागर करण्यात येतो.
------------------------------
बहिरीनाथाच्या पालखीची परंपरा अखंडितपणे चालत सुरू आहे. नवी मुंबई, पनवेल, उरण, ठाणे, मुंबई, कल्याण येथून हजारो भाविक देवाच्या दर्शनाला येतात. दिवाळी फराळासोबत नवस केलेल्या विविध वस्तू अर्पण केल्या जातात. त्यानंतर दुपारी होडीत बसवून निरोप देतात.
- चंद्रकांत देवकर, ग्रामस्थ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Collector Office Bomb Alert : कोल्हापूर कलेक्टर ऑफिस बॉम्बने उडवणार, जिल्हाधिकाऱ्यांना मेल; ५ किलो आरडीएक्स, अख्खं कार्यालय खाली

YouTube वर Share Market चे Video बघता का? चमत्कारिक नफा मिळवण्याच्या आश्वासनामागील खरं सत्य काय? नक्की वाचा विषय २.५२ कोटींचा आहे

Latest Marathi News Live Update : स्वाभिमानी शेतकऱ्यांचा पुणे–सोलापूर महामार्गावर रास्ता रोको, सोलापूरमध्ये आंदोलन पेटलं

Dombivli Politics: बदल्यांच्या आदेशात मयत, निवृत्त आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांची नावं, महापालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघड

IND vs UAE U19 : १४ षटकार, ९ चौकार! वैभव सूर्यवंशीचे द्विशतक हुकले; पण पठ्ठ्याने नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड, १७ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

SCROLL FOR NEXT