मुंबई

कल्याण अवती-भवती

CD

विश्वनाथ दर्शन सोसायटीत सांस्कृतिक कार्यक्रम
डोंबिवली, ता. २० (बातमीदार) : डोंबिवलीतील रामनगर प्रभागातील विश्वनाथ दर्शन सोसायटी ही केवळ एक गृहनिर्माण संस्था नसून एक कुटुंब आहे. गेली अनेक वर्षे ही सोसायटी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने राबवत आहे. श्री गणेश याग असो की नवचंडी याग येथील सर्व धार्मिक कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडतात. या धार्मिक कार्यक्रमांसोबतच अनेक सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले जातात.

सोसायटीचे सांस्कृतिक मंडळ मोठ्या उत्साहाने सर्व कार्यक्रमांचे आयोजन करते. सोसायटीचा स्वतःचा सूर विश्वनाथ नावाचा गायकांचा संच आहे, जो नवीन गायकांसाठी एक खुले व्यासपीठ उपलब्ध करून देतो. गेल्या पाच वर्षांपासून हा कार्यक्रम होत असून, सुरुवातीला दोन गायकांनी सादर केलेला हा कार्यक्रम आज सात गायक-गायिका यशस्वीपणे सादर करीत आहेत.

आज दिवाळीनिमित्त ‘दिवाळी पहाट’ हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. वेदक, खानविलकर यांसारख्या जुन्या जाणत्या गायकांबरोबरच स्मिता कळमकर, भाग्यश्री मराठे, सारा भानुशाली यांनी आपली कला सादर केली. त्यासोबतच संगीतविशारद आसावरी नवरे यांनी पाहुण्या कलाकार म्हणून फार छान गाणी सादर केली.

एकंदरीत नेहमीप्रमाणेच हा कार्यक्रम उत्साहात आणि आनंदात झाला. नंतर सर्व उपस्थित मंडळींनी दिवाळी फराळाचा एकत्रित आनंद लुटला. सोसायटीचे अध्यक्ष मिलिंद सहस्त्रबुद्धे आणि सर्व सभासद हे कार्यक्रम उत्साहात करीत असतात. सोसायटीत दोन ते तीन महिन्यांनी एकतरी कार्यक्रम होत असतो, ज्याचा मुख्य हेतू सर्वांनी एकत्र येणे हाच असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Maggi Video: डिग्रीपेक्षा कढई भारी? डोंगरात मॅगी विकून लाखोंची कमाई; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Latest Marathi News Live Update : भारत-युरोपियन संघाच्या मुक्त व्यापार करारावर सह्या : PM मोदी

Girish Mahajan Statement : 'आंबेडकर जयंतीला ट्रॅक्टर चालवतो', प्रजासत्ताक दिनाच्या राड्यानंतर गिरीष महाजनांनी व्हिडिओ जारी करत दिलगिरी केली व्यक्त

वैभव सूर्यवंशीला पाकिस्तानी घाबरले; १९ वर्षांखालील वर्ल्ड कपमधील India vs Pakistan लढतीवर बहिष्कार टाका! मिळाला अजब सल्ला...

रागाच्या भरात नाही, तर या कारणामुळे ओंकारने घेतला आलोक सिंग यांचा जीव, माजी आमदाराची पोस्ट चर्चेत!

SCROLL FOR NEXT