मुंबई

ऐरोलीमध्ये दिवाळी पहाट उत्साहात

CD

ऐरोलीमध्ये दिवाळी पहाट उत्साहात
वाशी, ता. २० (बातमीदार) ः ऐरोलीकरांनी दिवाळी पारंपरिक व भक्ती संगीताच्या सुरेल मैफलीत आणि ढोल-ताशांच्या निनादात अनोख्या पद्धतीने साजरी केली. ममित चौगुले युवा प्रतिष्ठान आयोजित दिवाळी पहाट २०२५चे आयोजन सोमवारी (ता. २०) ऐरोली सेक्टर आठ येथील मंगला नारायण रायकर चौक, यश पॅराडाईजजवळ करण्यात आले होते. या वेळी माजी नगरसेवक ममित चौगुले, उपनेते विजय चौगुले, समाजसेवक शुभम चौगुले, अमित चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि रायकर चौकात साकारलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणीतील शिल्पाचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर पहाटेच्या भक्तिगीतांनी, मराठमोळ्या गाण्यांनी रंगलेल्या मनोरंनात्मक कार्यक्रमाने आणि त्यानंतर झालेल्या तरुणाईच्या ढोलताशांच्या गजरावर ठेका धरत ऐरोलीकर रसिकांच्या दिवाळीच्या उत्सवाची रंगत अधिकच वाढली. या वेळी ममित चौगुले यांच्या वतीने निराधार महिला, सफाई कर्मचारी, अनाथ मुले यांनी दिवाळी भेट देऊन त्यांची दिवाळी गोड करण्यात आली. तसेच समाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तीचादेखील या वेळी सन्मान करण्यात आला. या वेळी संवाद साधताना जिल्हाप्रमुख ममित चौगुले म्हणाले, की दिवाळीनिमित्त नागरिकांनी एकत्र यावे. त्यांच्यात आठवणींना उजाळा मिळावा. खऱ्या अर्थाने दिवाळीचा आनंद घेता यावा यासाठी आयोजन करण्यात आले होते.
...............
नवी मुंबईत कला, संस्कृती आणि तरुणाईचा झगमगता जल्लोष!
वाशी, ता. २० (बातमीदार) ः नवी मुंबई जिल्हा युवासेनातर्फे आयोजित दीपोत्सव २०२५ हा भव्य सांस्कृतिक महोत्सव गोठिवली येथील भारतरत्न स्व. राजीव गांधी तलाव खदान येथे मंगलमय वातावरणात उत्साहात पार पडला. दीपमाळांच्या तेजोमय प्रकाशात पारंपरिक संस्कृतीचा गंध आणि तरुणाईची ऊर्जा यांनी सजलेला हा उत्सव नवी मुंबईकरांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. रविवारी (ता. १९) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या वेळी प्रज्वलित दिव्यांच्या साक्षीने संपूर्ण परिसर उजळून निघाला होता. तीन तास संगीत, नृत्य, काव्य आणि विविध सांस्कृतिक कलाकृतींच्या सादरीकरणांनी वातावरण भारावून गेले. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन खासदार नरेश म्हस्के, युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या हस्ते पार पडले. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून राहुल लोंढे आणि मंगेश चिवटे यांनी उपस्थित राहून तरुणाईला प्रोत्साहन दिले. याप्रसंगी युवासेना नवी मुंबईचे जिल्हाप्रमुख अनिकेत रमाकांत म्हात्रे यांनी सांगितले, की दीपोत्सव हा फक्त कार्यक्रम नाही, तर समाजातील एकतेचा आणि संस्कृतीचा दीप आहे. तरुणाईच्या ऊर्जेतून संस्कृतीचा वारसा पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी झाला, हीच आमची खरी कमाई आहे. या कार्यक्रमास माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, माजी उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे तसेच माजी नगरसेविका अनिता सुरेश मानवतकर यांनी उपस्थिती लावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RJD Candidate Arrested : उमेदवारी अर्ज दाखल करताच 'राजद'च्या उमेदवारास झारखंड पोलिसांनी केली अटक!

Deglur Accident : बस व ट्रॅव्हल्स समोरासमोर अपघात २८ जण गंभीर जखमी, लेंडी पुला जवळील घटना; २ तास वाहतूक खोळंबंली

'२०२७ वनडे वर्ल्ड कप जिंकायचा असेल, तर आगरकर - गंभीरला पदावरून हटवा!', Navjot Singh Sidhu खरंच असं म्हणाले? स्वत:च केला खुलासा

Diwali Celebration : ऑपरेशन पहाट; सोलापूर पोलिसांनी पारधी कुटुंबांसोबत साजरी केली दीपावली, शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

Actor Asrani Passes Away : ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचं निधन, ८४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT