मुंबई

खोपोली नगरपालिका निवडणूक रंगतदार होणार

CD

खोपोली नगरपालिका निवडणूक रंगतदार होणार
महायुतीमध्येच होणार सामना
खोपोली, ता. २३ (बातमीदार) ः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहे. यात खोपोली नगरपालिकेचाही समावेश आहे. या वेळी खोपोली नगरपालिका निवडणूक प्रचंड रंगतदार होणार असून, खरा सामना महायुतीमधील प्रमुख घटक राजकीय पक्षांतच होणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. दरम्यान, महाविकास आघाडी व खोपोली शहर नागरी कृती समितीच्या माध्यमातूनही तोडीसतोड उमेदवार देण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
महायुतीमधील आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व आमदार प्रशांत ठाकूर व यशवंत साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप ही युती न करता नगराध्यक्षसहित सर्व प्रभागात स्वतंत्र उमेदवार देण्यासाठी पूर्ण तयारी करीत आहेत. नगराध्यक्षपदासाठी महायुतीमधील या तिन्ही राजकीय पक्ष व त्यांच्या नेतृत्वात कमालीची रस्सीखेच होणार आहे. वर्तमान स्थितीत शहरात राजकीय दृष्टीने शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मोठे प्राबल्य आहे. खरी लढत शिवसेनाविरोधात राष्ट्रवादी व पर्यायाने आमदार महेंद्र थोरवे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधाकर घारे यांच्याबरोबर होणात आहे.
दरम्यान, या दोघांच्या संघर्षात लाभ मिळण्यासाठी भाजप व महाविकास आघाडीकडूनही तोडीसतोड उमेदवार देण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. एकंदरीत चर्चा व राजकीय वाटचालीनुसार शिवसेना शिंदे गटाकडून माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. मागील वेळी विजयी झालेल्यांना ही नगरसेवकपदाची उमेदवारी पक्की मानली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून माजी नगराध्यक्ष डॉ. सुनील पाटील यांच्यासहित माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ नेते दत्ताजी मसुरकर, माजी गट नेते मंगेश दळवी हे प्रमुख दावेदार आहेत. भाजपकडून विक्रम साबळे यांची नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी निश्चित मानली जात आहे. दुसरीकडे महाविकाकास आघाडी व खोपोली शहर कृती समितीकडून एक प्रभावी व सर्व बाबतीत तोडीसतोड उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविण्यासाठी व्यूहरचना सुरू आहे. खोपोली शहरातील राजकीय स्थिती व स्थानिक राजकीय गणिते बघता नगराध्यक्ष व नगरसेवकपदासाठी खरी लढाई महायुतीतच रंगणार असून, याचा लाभ काही प्रमाणात महाविकास आघाडीला होण्याची शक्यता दिसत आहे. दरम्यान, मुदत संपुष्टात येऊन तीन वर्षे झाली असल्याने मागील नगरसेवक किंवा नगरसेविका तसेच शहरातील व त्या त्या प्रभागातील विकासाची कामे मागे पडली आहेत. राजकीय ताकद, व्यक्तिगत संपर्क व शक्ती आणि प्रचंड आर्थिक बळ ज्याच्याकडे तोच उमेदवार प्रभावी ठरणार असल्याचे चित्र बनले आहे.
............
शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमेश मोरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
माणगाव, ता. २३ (वार्ताहर) ः रायगड जिल्ह्यातील राजकारणात दिवाळीच्या मुहूर्तावर मोठा राजकीय धमाका झाला आहे. शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमेश मोरे, खरवलीचे सरपंच संतोष खडतर तसेच अनेक शिवसैनिक पदाधिकारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून शिवसेनेला धक्का दिला आहे. हा पक्षप्रवेश खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार, ता. २३ ऑक्टोबर रोजी सुतारवाडी येथे छोटेखानी सोहळ्यात पार पडला. या वेळी उपसरपंच सुजीत सपकाळ, मधुकर अर्बन, नथुराम आडीत, नथुराम कोळी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. रमेश मोरे आणि संतोष खडतर यांच्या प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढल्याचे मत खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केले. तसेच काही गैरसमज झाल्याने ते पक्षापासून दूर गेले होते, परंतु ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतले आहेत. त्यांचे मनःपूर्वक स्वागत आहे, असे ते म्हणाले. तटकरे पुढे म्हणाले, की राजकीय जीवनात टीका टिप्पणी अपेक्षित असते, मात्र काही विरोधक वैयक्तिक स्तरावर टीका करून राजकीय संस्कृतीचा ऱ्हास करीत आहेत. जनता मतपेटीतून त्यांना योग्य उत्तर देईल. विकासकामे आणि सामाजिक सलोखा यावर आमचा भर आहे. रमेश मोरे यांचा आजचा प्रवेश हा प्रातिनिधिक स्वरूपाचा असून, लवकरच मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. तेव्हा आणखी काही राजकीय बॉम्ब फोडले जातील, अशी सूचक घोषणा त्यांनी केली. याप्रसंगी माजी आमदार अनिकेत तटकरे, प्रवक्ते ॲड. राजीव साबळे, हनुमंत जगताप, कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, तालुका अध्यक्ष काका नवगणे, महादेव बक्कम, बाबू खानविलकर, शैलेश भोनकर, ॲड. सुशील दसवते, दीपक जाधव, राजू शिर्के, शादाब गैबी, चंद्रशेखर देशमुख, अल्ताफ भाई धनसे, गोरेगाव सरपंच झुबेर अब्बासी, हुसेन रहाटवीलकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
...............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारतीय संघ सेमीफायनलमध्ये! न्यूझीलंडचे पराभवासह आव्हान संपलं; स्मृती मानधना-प्रतिका रावल विजयाच्या नायिका

Raireśhwar Fort Incident VIDEO : रायरेश्वर किल्ला परिसरात दारू पार्टी करणाऱ्या परप्रांतीय तरूणांना शिवप्रेमींकडून चोप!

Ambulance Fire : मध्यरात्री लातूरकडे जाताना ॲम्बुलन्स जळून खाक! डॉक्टरांनी दाखवले प्रसंगावधान, महिलेचा जीव वाचला

Lonar News : समृद्धी महामार्गावर मोठी कारवाई! संशयास्पद कंटेनर चालकाजवळ आढळले देशी पिस्तूल व जिवंत काडतुसे

PM Kisan Yojana News: पीएम किसान योजनेच्या २१ व्या हप्त्याबाबत नवीन अपडेट; जाणून घ्या, २००० रुपये कधी येणार?

SCROLL FOR NEXT