फटाक्यांप्रकरणी १५३ जण अटकेत
कोलकाता, ता. २३ ः फटाक्यांबाबतच्या नियमांना हरताळ फासणाऱ्या १५३ नागरिकांना कोलकाता पोलिसांनी अटक केली आहे. बंदी असलेले फटाके वाजवण्यासह इतर अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. यापैकी सात जणांनी प्रतिबंधित फटाके वाजवल्याचा आरोप आहे. या मोहिमेदरम्यान अधिकाऱ्यांनी १६.९५ किलो प्रतिबंधित फटाके आणि १४.४ लिटर अवैध दारू जप्त केली. पोलिसांनी दिवसभरात ३८३ वाहतुकीसंबंधी कारवाया केल्याचेही सांगण्यात आले.