मुंबई

ठाकरे बंधू मुंबईवगळता अन्यत्र एकत्र येणार नाहीत!

CD

ठाकरे बंधू मुंबई वगळता अन्यत्र एकत्र येणार नाहीत!
देवेंद्र फडणवीसांचे भाकीत

मुंबई, ता. २३ ः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येत असल्याच्या जोरदार चर्चा सुरू असल्या तरी मुंबई वगळता अन्यत्र हे बंधू एकत्रित निवडणूक लढविणार नाहीत, असे भाकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या स्नेहसंमेलनादरम्यान पत्रकारांशी औपचारिक गप्पा मारताना फडणवीस यांनी निवडणुकीतील अनेक समीकरणांबाबत भाष्य केले. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे का, यावर उत्तर देताना मुंबईव्यतिरिक्त ठाकरे बंधू एकत्र येणार नाहीत, असे मुख्यमंत्री म्हणाले. मुळात ठाकरे ब्रँड हा केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच होते. त्यामुळे या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने महायुतीला फारसा फरक पडणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.
ज्या ठिकाणी महायुतीमधील पक्षाची ताकद आहे, त्या ठिकाणी महायुतीमधील पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवतील. ज्या ठिकाणी एकत्रित ताकद आहे, त्या ठिकाणी आम्ही महायुती म्हणून निवडणूक लढविणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे, त्यामुळे त्या ठिकाणी युती करणार नसल्याचे सांगतानाच अजित पवार यांच्यामुळे ज्या ठिकाणी धर्मनिरपेक्ष मतांचा फायदा होणार आहे, त्या ठिकाणी अजित पवार हे सोबत असतील. त्याचबरोबर ठाण्यात किंवा कल्याण या भागातील निवडणुकांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात येणार आहेत. त्यामुळे तिकीटवाटपात कोणताही गोंधळ किंवा गैरसमज होणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
...
मंत्रिमंडळात बदल नाही!
गुजरातमध्ये मंत्रिमंडळात झालेल्या बदलाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात असे काही होणार असल्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. महाराष्ट्रातील सर्व मंत्री कार्यक्षम आहेत. त्यामुळे कोणालाही बदलण्यात येणार नाही. सरकारला पुढच्या महिन्यात एक वर्ष पूर्ण होणार आहे. त्या वेळी सर्व मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड तपासण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
...
मतदार यादीतील घोटाळ्याबाबत...
मतदार यादीमधील कथित गोंधळावरून विरोधक निवडणूक आयोग आणि सरकारला निशाणा करीत आहेत; मात्र लवकरच विरोधकांनी मतदार यादीमध्ये केलेल्या घोटाळ्याची माहिती जनतेसमोर आणणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले.

World Cup 2025: भारतीय संघ सेमीफायनलमध्ये! न्यूझीलंडचे पराभवासह आव्हान संपलं; स्मृती मानधना-प्रतिका रावल विजयाच्या नायिका

Raireśhwar Fort Incident VIDEO : रायरेश्वर किल्ला परिसरात दारू पार्टी करणाऱ्या परप्रांतीय तरूणांना शिवप्रेमींकडून चोप!

Ambulance Fire : मध्यरात्री लातूरकडे जाताना ॲम्बुलन्स जळून खाक! डॉक्टरांनी दाखवले प्रसंगावधान, महिलेचा जीव वाचला

Lonar News : समृद्धी महामार्गावर मोठी कारवाई! संशयास्पद कंटेनर चालकाजवळ आढळले देशी पिस्तूल व जिवंत काडतुसे

PM Kisan Yojana News: पीएम किसान योजनेच्या २१ व्या हप्त्याबाबत नवीन अपडेट; जाणून घ्या, २००० रुपये कधी येणार?

SCROLL FOR NEXT