मुंबई

अलिबागमधील वाडगावमधून भेकर प्राण्याचे मांस जप्त

CD

वाडगावमध्ये भेकर प्राण्याचे मांस जप्त
अलिबाग, ता. २४ (वार्ताहर) : तालुक्यातील वाडगाव येथे एका घरात भेकर (संरक्षित वन्यजीव प्राणी) प्राण्याचे मांस अलिबाग पोलिसांनी वन विभागाच्या मदतीने गुरुवारी (ता. २३) कारवाई करून जप्त केले आहे. याप्रकरणी आरोपी जयेंद्र काशिनाथ भगत याच्याविरोधात वन अधिकाऱ्यांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना आरोपी जयेंद्र याने फणसाड अभयारण्यातील भेकरची शिकार करून मांस घरात बाळगल्याची माहिती मिळाली. याआधारे त्यांनी वाडगाव येथील आरोपीच्या घरी छापा टाकला. यात त्याच्या घरातून सुमारे एक किलो वजनाचे भेकर प्राण्याचे मांस जप्त करत पुढील कारवाईसाठी वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले. शिकार करताना आरोपीसोबत आणखी कोण साथीदार होते, याचा शोध पोलिस आणि वन विभाग घेत आहेत. संरक्षित वन्यजीव प्राण्यांची शिकार न करण्याचे आणि त्यांचे मांस बाळगू नये, असे आवाहन पोलिस व वन विभागाने केले आहे. या कारवाईत पोलिस निरीक्षक एस. व्ही. लांडे (अति. कार्यभार अलिबाग), सहा. पोलिस निरीक्षक सरिता मुसळे हवालदार प्रदीप देशमुख, जितेंद्र चवरकर, पोलिस शिपाई गणेश पारधी, सागर गोळे यांनी सहभाग घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra liquor policy : राज्य सरकारची नवी 'महाराष्ट्र मद्य श्रेणी' अडचणीत?; बड्या कंपन्यांनी कोर्टात दिलं आव्हान!

SMAT 2025: गंभीरच्या राजकारणाचा बळी पडलेल्या गोलंदाजाने घेतली हॅटट्रिक; ट्वेंटी-२० संघातून दाखवला होता बाहेरचा रस्ता, पठ्ठ्याने...

Winter Car Care Tips: हिवाळ्यात कारच्या मेंटेनन्स चिंता मिटवा! 'या' 5 टिप्समुळे बॅटरी, टायर, इंजिन राहील परफेक्ट

Business Ideas for Women: ऑफिसचा ताण संपला! महिलांसाठी घरबसल्या सुरु करता येतील असे कमी गुंतवणुकीचे फायदेशीर व्यवसाय

रजनीकांतसाठी श्रीदेवीचा ७ दिवसांचा उपवास! बोनी कपूरांनाही थक्क करणारी गोष्ट

SCROLL FOR NEXT