मुंबई

भाऊबीजेला लाडक्या भावाची सोनसाखळी लोकल प्रवासात चोरीला

CD

लोकल प्रवासात सोनसाखळी चोरीला
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ ः ठाण्यात लोकल प्रवासातील गर्दीतून उतरताना एका ज्येष्ठाची सोनसाखळी चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत ३० ग्रॅम वजनाची सोनसाखळी चोरल्याचे तक्रारीत नमूद केले गेले आहे.
६१ वर्षीय ज्येष्ठ हे विलेपार्ले येथे राहणारे असून त्यांचा स्वतःचा प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय आहे. गुरुवारी (ता. २३) ते सकाळी भाऊबीजेनिमित्त बहिणीकडे गेले होते. या वेळी ठाणे रेल्वेस्थानकात उतरताना गळ्यातील सोनसाखळी खेचल्याचे त्यांना जाणवले. फलाटावर उतरल्यावर सोनसाखळी मिळून आली नाही. याप्रकरणी त्यांनी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. यामध्ये २१ हजार रुपये किमतीची ३० ग्रॅम वजनाची सोनसाखळी चोरीला गेल्याचे नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास ठाणे लोहमार्ग पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India SIR Schedule: बिहारनंतर देशातील १२ राज्यांमध्ये एसआयआर लागू, निवडणूक आयोगाची मोठी घोषणा, जाणून घ्या 'या' राज्यांची नावे

'ह्युमन कोकेन' हिंदी सायकॉलॉजिकल थ्रिलर लवकरच होणार रिलीज ! पुष्कर जोगचा नवा प्रयोग

Bachu Kadu News: 'तर आम्ही छातीवर गोळी घ्यायला तयार', कडू संतापले!

Latest Marathi News Live Update : मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिम ओशिवरा परिसरात हिट अँड रन केस! बेस्ट बस चालकाची तीन गाड्यांना जोरदार धडक

Georai News : अनाथालयात वाढलेला बनला दोन अनाथ मुलींचा पाठीराखा; दत्तक घेत शिक्षणाची जबाबदारी उचलत साजरी केली भाऊबीज

SCROLL FOR NEXT