मुंबई

टीम इंडियाला तीन सुवर्ण

CD

टीम इंडियाला तीन सुवर्ण
टोकियो कराटे विश्वचषक
मुंबई, ता. २५ ः जपानमधील टोकियोच्या टोकियो स्पोर्ट्स अँड कल्चर सेंटर स्टेडियमवर झालेल्या अकराव्या केडब्ल्यूएफ कराटे विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने अशा यूथ ए टीम-काता प्रकारात तीन सुवर्णपदके मिळविली.
विजयी संघाचा कॅप्टन कैरव चव्हाण आणि सहकारी अनिश भागवत व आदित्य गद्रे यांनी ‘बसाई दाई काता’ सादर केला. त्यामुळे त्यांनी रशिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघांवर विजय मिळवला. कराटेच्या अनेक प्रमुख जागतिक स्पर्धांमध्ये २०१३ पासून केडब्ल्यूएफ आंतरराष्ट्रीय परिषद, गाशुकू आणि कराटे विश्वचषकात टीम इंडिया सक्रियपणे भाग घेत आहे आणि त्यांनी अनेक रौप्यपदकांची कमाई केली आहे; मात्र यावर्षी भारताला तीन सुवर्णपदके मिळाली. या स्पर्धेत १४ देशांचे २३९ स्पर्धक होते. भारताच्या ११ वर्षांच्या दिव्यांक्षी दत्ता हिने वैयक्तिक काता आणि कुमिते या दोन्ही स्पर्धांमध्ये अनुकरणीय धैर्य दाखवले. तीव्र स्पर्धा असूनही, ती उपांत्य फेरीपर्यंत पोहोचली. तसेच अभिनव कोटीयन यालादेखील पदक मिळाले नाही तरी त्याने आपल्या कौशल्याने आणि आत्मविश्वासाने सर्वांची मने जिंकली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: डोळे काढले, शरीरावर १५० जखमा अन्...; १४ वर्षीय प्रेयसीसोबत भयंकर कृत्य, ४८ वर्षीय प्रियकराने क्रूरतेच्या मर्यादा ओलांडल्या

IND vs SA: 'ऋतुराजला एका अपयशामुळे टीम इंडियातून काढू नका, मी हात जोडले...', माजी क्रिकेटरची विनंती

Army Jawan : देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या जवानाचा यथोचित सन्मान; सैनिकाच्या 'त्या' कृतीने जिंकली मने, असं काय केलं?

PMC Hoarding Fee : होर्डिंग शुल्क दरवाढीचा ठराव शासनाकडून रद्द; महापालिकेला मोठा झटका!

Pune Airport Traffic Update : विमानतळ परिसरात वाहतूक बदल; दोन मार्गांवर एकेरी वाहतूक लागू!

SCROLL FOR NEXT