मुंबई

पोसरी गावाजवळ ओढ्यात आढळला तरुणाचा मृतदेह

CD

पोसरी गावाजवळील ओढ्यात तरुणाचा मृतदेह
कर्जत, ता. २५ (बातमीदार) ः तालुक्यातील पोसरी गावाजवळ उल्हास नदीलगतच्या ओढ्यात आज सकाळी एका २५ ते ३० वयोगटातील तरुणाचा मृतदेह आढळून आला. स्थानिकांनी पाण्यात मृतदेह तरंगताना पाहिल्यानंतर तत्काळ पोलिसांना माहिती दिली. मृतदेहावर कोणत्याही जखमा आढळल्या नाहीत, तसेच पायातील चप्पलही तशीच होती; मात्र मृतदेह पाण्यात बुडालेला असल्याने काही भाग माशांनी खाल्ला असल्याचे दिसून आले, ज्यामुळे मृत्यू काही तास किंवा एक दिवसापूर्वी झाल्याचा अंदाज आहे.
दारूच्या नशेत पाय घसरून पाण्यात पडल्याची शक्यता वर्तवण्यात येत असली, तरी ओढ्यात स्थिर पाणी असल्याने मृत व्यक्ती स्वतःहून तेथे गेली की त्याला कोणी आणले, हे गूढ कायम आहे. मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नसून, तो परप्रांतीय असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात पाठवला असून, घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Winter Session : आमदारांचं भव्य स्वागत, फुलांच्या रांगोळ्या अन् पुष्पकमान; कँटिनमध्ये खास वऱ्हाडी पदार्थांची मेजवानी...

Sakal Suhana Swasthyam : योग्य गुरू लाभणे सर्वांत मोलाचे संचित; ‘सकाळ’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांची भावना

Cm Devendra Fadnavis : राज्य दिवाळखोरीकडे नाही; आरोपांचा घेतला समाचार

Raigad Fort Illegal Hotels : रायगडावर विनापरवानगी हॉटेल, रेस्टॉरंट, कॅफे; रोप -वे कंपनीचे अतिक्रमण, संभाजीराजेंचा घणाघात, "पुरातत्व विभागाकडून पाठबळ"

बिबट्यांना 'जन्मठेप', बालकांचा बळी घेणाऱ्या ४ बिबट्यांबाबत वनविभागाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT